www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे, याची काहीही माहिती नाही. पालक वर्गाचे दहाविच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र सोशल मीडियातून दररोज निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरत असल्यामुळे निकालाची आतुरतेने वाट पाहणार्या विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडत आहे.
यंदा दहावीचा निकाल `लटकल्या`मुळे पुढील प्रवेशप्रक्रियेचाही `फज्जा` उडण्याची शक्यता आहे दिसून येत आहे. करीअरची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा असणार्या दहावीची दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा होते. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करते. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. डोळे लावून बसलेल्या पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी मंडळाने अद्याप निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. एसएससी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे, निकाल जाहीर करण्याचा आढावा सुरू आहे. दहावीच्या निकालाचे काम जलदगतीनेच सुरू आहे. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर व्हायला उशीर झाला असला तरी तो लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. परंतु सोशल मीडियातून दररोज निकालाच्या तारखेबाबत अफवा पसरविल्याने पालकांची चांगलीच दमछाक होत आहे. टेन्शनमध्ये वाढ झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.