पहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा

नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.

PTI | Updated: Aug 21, 2015, 10:08 AM IST
पहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा title=

नवी दिल्ली : नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.

शाळांमध्ये आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण सल्लागार बोर्डाच्या (कॅब) बुधवारी झालेल्या ६३ व्या बैठकीत परीक्षा घेण्याबाबत मंजुरी देण्यात आली. सर्व राज्यांचे याबाबत एकमत असल्याची माहिती देण्यात आली.

आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांत शिकणे आणि लिहिण्या-वाचण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याच्या मुद्द्यावर हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली १९ राज्यांचे शिक्षणमंत्री आणि २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. आम्ही राज्यांकडून १५ दिवसांत लेखी सल्ला मागितला आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. शाळेलय दप्तराचे ओझे घटवण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली, इराणी यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.