आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा

आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा रविवारी होतेय. अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी देशभरातून पाच लाखांवर विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात ५४ केंद्रांवर ही परीक्षा होईल. ही मुलं अभ्यासात मग्न आहेत. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा रविवारी देशभरात होत आहे.

Updated: Apr 7, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

आयआयटी प्रवेशासाठी जेईईची परीक्षा रविवारी होतेय. अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी देशभरातून पाच लाखांवर विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात ५४ केंद्रांवर ही परीक्षा होईल.

 

 

ही मुलं अभ्यासात मग्न आहेत. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडणार आहे. आयआयटी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा रविवारी देशभरात होतेय. अत्यंत आव्हानात्मक अशा या परिक्षेसाठी तेवढीच कसून तयारी करावी लागते. देशभरातून पाच लाख सहा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. देशभरातल्या १५ आयआयटीत ९ हजार ५९०इतक्या जागा आहेत. म्हणजे एका जागेसाठी ५३ विद्यार्थी असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात जेईई परीक्षेसाठी ५४ केंद्र आहेत. मुंबईत १६, पुण्यात ९ , नवी मुंबईत सहा, अकोल्यात दोन तर  सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी इथं एकेक परीक्षा केंद्र आहेत. अकोल्यात दोन केंद्र आहेत. नवी मुंबईत सहा केंद्र आहेत.

 

 

प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना यंदा किमान गुणांची अट आहे.  खुल्या गटात किमान ३५ टक्के तर प्रत्येक विभागात १० टक्के गुण गरजेचे आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी ३१.५ आणि ९ टक्के हवेत. अनुसूचित जाती जमातींसाठी १७.५ आणि ५ टक्के गुणांची अट आहे.  ही परीक्षा दिल्यावर इतर परीक्षांचा अंदाज येतो असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. निगेटीव्ह मार्किंगमुळे ही परीक्षा आव्हानात्मक असते.

 

 

माजी आयआयटीएन्सी या परीक्षेबाबत परीक्षार्थींना सल्ला देत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलाय. पुर्वी या परिक्षांना सविस्तर उत्तरे लिहावी लागत मात्र आता ऑबजेक्टीव्ह स्वरुपामुळं विद्यार्थ्यांना अधिक अचूक उत्तरं द्यावी लागतात असं 1969 मध्ये ही परीक्षा पास झालेल्या रविंद्र नाडकर्णी यांनी आपला अनुभव सांगितलाय.

 

 

या परीक्षेत केवळ पाठांतर करुन यश मिळत नाही. तर पाया पक्का सावा लागतो असं लेखक आणि आयटी क्षेत्रातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी सांगितलय. आयआयटीतून बाहेर पडलेल्यांना अनेक संधी खुणावतात. परदेशात सर्वाधिक संधी आयआयटीनना असल्यानं अच्युत गोडबोलेंनी देशाला विसरू नका असा सल्लाही दिलाय. आयआयटीत प्रवेश मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. त्यासाठी खडतर परीक्षेला त्यांना सामोरं जावं लागणार. आता शांत डोक्याने पेपर सोडवल्यास आयआयटी प्रवेशाचं स्वप्न साकार होईल.