नक्षलवाद्यांची अपहरणनीती

शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी - नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.

Updated: Apr 26, 2012, 11:45 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी -  नक्षलवादी असा प्रवास नक्षवादी चळवळीने केलाय.. शोषीत वर्गाला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशातून नक्षवादी चळवळीचा जन्म झाला..

 

1925 साली बंगालमध्ये स्थापण झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये 1964 च्या चीनयुध्दानंतर वैचारीक फुट पडली..आणि त्याच दरम्यान उग्र डाव्या विचारसरणीच्या  चारु मुजुमदार यांनी वेगळी वाट धरली..  18 मे 1967 ला जंगल संथाळच्या सिलीगुडीत झालेल्या किसान सभेत त्यांनी सशस्त्र उठावाचा ठराव मंजूर केला .. त्यासभेची  परिणती म्हणून पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या छोट्याश्या खेड्यात  एका श्रीमंत सावकाराची हत्या करण्यात आली ..नक्षलबारीतल्या सर्व शेतक-यांना त्या सावकाराच्या जाचातून मुक्त करण्यात आलं....त्या घटनेनंतर आदीवासींच्या  सगळ्या आंदोलनाचे रुपच बदलून टाकलं.....स्वहक्कासाठी लढणा-या आदीवासींना आता नक्षलवादी असं नाव मिळालं होतं...पश्चिम बंगालच्या एका लहानशा खेड्यातून सुरु झालेल्या या   लढ्याला पुढे शोषीतांचं मोठं समर्थन  मिळालं...हातात शस्त्र घेतलेल्या गरिब- आदीवासींना पाहून जुलमी सावकारांना घाम फुटू  लागला होता.

 

जंगल  आणि अविकसीत भागातील जनतेकडून या चळवळीला मोठं समर्थन मिळत गेलं...नंतरच्या काळात आंध्रप्रदेशात या चळवळीने आपली पाळमुळ रोवायला सुरुवात केली..तसेच महाराष्ट्राच्या अतिदुर्गम समजल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातही ही चळवळी पोहोचली.....हे दोन्ही जिल्हे जंगल आणि  नैसर्गिक साधनसंपत्ती  नटलेलं आहे..तेंदूपत्ता ,पेपरमिल्स आणि खनिज खाणी या परिसरात आहेत...आणि त्याचा फायदा नक्षलवादी चळवळीला होतआहे... 60 च्या दशकात जे नक्षलवादी शोषणाविरुध्द उभे ठाकले होते तेच आता शोषणकर्ते बनल्याचं चित्र आहे....भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,बल्लारपूर आणि  गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडं पैसा आहे...तसेच   अत्याधुनिक शस्त्रास्त्रही त्यांच्या हाती  आली आहेत..पैसा आणि शस्त्रांच्या जोरावर नक्षलवाद्यांनी रेड कॉरीडॉरच्या  नावाखाली  देशातल्या 630 पैकी 180 जिल्ह्यात आपलं नेटवर्क तयार केलं आहे....खरं तर ही चळवळ रोखण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्यातच अनेकांना रस असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालय...आणि त्यामुळेच नक्षलवाद्यांच्या  क्रांतीचा रंग लाल झालाय.. तो फक्त दडपल्या गेलेल्या निष्पाप आदिवासींच्या रक्तानं......

केवळ राज्यातच नाहीतर देशभरात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्यायत.. भुसुरुगाचे स्फोट आणि बंदची हाक देणा-या नक्षलवाद्यांनी आता अपहरणच्या माध्यमातून सौदेबाजीला सुरुवात केलीय.. ओडिशातील आमदार झिना हिकाका यांचे अपहरण करुन त्यांची सुटका करण्यात आली.. आपल्या मागण्यांसाठी अपहरण करण्याची नक्षलवांद्याची नवी अपहरणनीती आता सगळीकडेच दिसू लागलीय..

 

14 मार्चला दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण

24 मार्चला ओदिशातील आमदार झिना हिकाकाचे अपहरण

21 एप्रिलला छत्तीसगडमधील सुकामचे जिल्हाधिकारी एलेक्स मेनन यांचे अपहरण

 

अवघ्या दोन महिन्यातल्या या घटनांनी पोलिस- प्रशासन आणि सर्वसामान्यही हतबल झालेयत.. आपल्या मागण्यांसाठी बंद आणि भुसुरुंगाचे स्फोट घडवणा-या नक्षलवाद्य़ांनी आता अपहरणाची खेळी करत आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यास सुरुवात केलीय.. गडचिरोलीत नक्षलवाद्याचा खरा चेहरा मात्र समोर यायाला सुरुवात झालीय.. आपली लढाई ही आदिवासी आणि गावक-यांसाठी आहे अस भासवत हत्या करुन गावक-यांमध्ये आपली दहशत पसरावयाची आणि प्रशासनानं आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अपहरण करायचं हे सूत्र नक्षल्यांनी