www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी तिने आपल्या दोन्ही स्तनांवर ब्रेस्ट सर्जरी करुन घेतलीय.. डबल मॅसटेकटॉमी पद्धतीत स्तनाचा काही भाग किंवा पूर्णपणे स्तन काढून टाकलं जातो...शास्त्रीय दृष्टीकोनातून स्वत:कडं पहाण्याचा नवी दृष्टी अँजेलीनाने महिलांना दिलीय...
जगातील सर्वात सुंदर स्त्रीयांपैकी एक समजली जाणारी हॉलीवूडचे अभिनेत्री अँजेलीना जोली आज ख-या अर्थाने इंटरनॅशनल स्टार ठरलीय...ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणा-या असंख्य महिलांना अँजेलीनाच्या या धाडसी निर्णयाचा फायदा होणार आहे...हॉलीवूडपटातून धाडसी व्यक्तीरेखा साकारणा-या एंजेलीनाने वैयक्तीक आयुष्यातही आपण धाडसी असल्याचं दाखवून दिलयं...संभावीत ब्रेस्ट कॅन्सर टाळण्य़ासाठी एंजेलीनाने आपल्या दोन्ही स्तनांवर डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया केलीय... डबल मॅसटेकटॉमी पद्धतीत स्तनाचा काही भाग किंवा पूर्णपणे स्तन काढून टाकलं जातं...एंजेलीनाला ब्रेस्ट तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता होती..त्यावर मात करण्यासाठी तिने डबल मॅसटेकटॉमीचा मार्ग अवलंबला...एंजेलीना या विषयी म्हणते....`डॉक्टरांच्या अंदाजानुसार मला स्तनाचा कॅन्सर होण्याची 87 टक्के शक्यता होती तर गर्भाशयचा कॅन्सर होण्याची शक्यता ५० टक्के इतकी होती.त्यावर मात करण्यासाठी तसेच हा धोका कमी करण्यासाठी मी हे पाऊल उचललं`
अँजेलीनावर डबल मॅसटेकटॉमीची प्रक्रिया यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली आणि एप्रिल महिन्यात ती संपली....एंजेलीनाच्या आईने जवळपास दहावर्ष कॅन्सरशी लढा दिला..वयाच्या ५६व्या वर्षी तिचा कॅन्सरने मृत्यू झाला..एंजेलीनाच्या शररिरातही बीआरसीए 1हा जीन असल्यामुळे तिला ब्रेस्ट तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढली होती..त्यामुळेच ९ आठवडे चालणा-या डबल मॅसटेकटॉमी करण्याचा निर्णय़ एंजेलीनाने घेतला..याशस्त्रक्रियेमुळे तिचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ८५ टक्क्यावरुन थेट ५टक्क्यांवर आलाय..या उपचारानंतर एंजेलीनाने व्यक्त केलेली भावना मोठी बोलकी आहे....`मी हा निर्णय घेतला आणि यामुळे माझं स्त्रीत्व जराही कमी झालं नाही.माझा लेख वाचणा-या महिलांना त्यांच्याकडं कोणता पर्याय आहे हे समजेल अशी मला आशा आहे.ज्यांच्या कुटुंबात ब्रेस्ट किंवा गर्भाशय कॅन्सरचा इतिहास आहे अशांना जागृत करण्याचा माझा प्रयत्न आहे.अशा महिलांनी जागृत होवून वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा तसेच आपला पर्याय निवडावा. `
एंजेलीनासाठी हा निर्णय घेण काही साधी गोष्ट नव्हती.. अनेक चित्रपटातून कणखर भूमिका साकारणा-या एंजेलीनाने हा धाडसी निर्णय़ घेऊन नवा आदर्श जगभरातील स्त्रियांसमोर निर्माण केला आहे...स्तनाच्या कर्करोगाशी लढतांना आपल्यासमोर असाही पर्याय असू शकतो हा संदेश या निमित्ताने अँजेलीनाने दिला आहे..तिचा हा निर्णय क्रांतीकारच म्हणावा लागेल...हॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अँजेलीना जोलीने जो निर्णय घेतलाय तो ब्रेस्ट कॅन्सरच्या दहशतीखाली जगणा-या महिलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे...
आज २१व्या शतकात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलं आहे...स्त्रीयांनी आपलं महत्व सिद्ध केलं आहे..स्तन ही स्त्रित्वाची एक ओळख मानली जाते...स्तन म्हणजे मातृत्व...हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने ब्रेस्ट कॅन्सरवर मात करण्यासाठी दोन्ही स्तनांवर डबल मॅसटेकटॉमी शस्त्रक्रिया केलीय...तिच्या या धाडसी निर्णयामुळे शास्त्रीय दृष्टीकोनातून स्वत:कडं पाहण्याची नवी दृष्टी अँजेलीनाने तमाम महिलावर्गाला दिलीय..अँजेलीनोचा हा निर्णय अत्यंत क्रांतीकार असाच आहे..माझ्या मुलांपासून त्यांची आई मृत्यूने हिरावून घेऊ नये यासाठी हा निर्णय़ घेतल्याचं अँजेलीनाने सांगितलंय..हॉलीवूडची सौंदर्यसाम्राज्ञी म्हणून तिचा उल्लेख केला जातो..
४ जून १९७५साली जन्मलेल्या या अभिनेत्रीने हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.. तीन गोल्डन ग्लोब,दोन स्क्रीन एक्टर्स गील्ड अवार्ड्स, एक ऑस्कर पुरस्कार तिने पटकावला आहे..
अँजेलीनाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात १९८२मध्ये बालकलाकार म्हणून केली..१९९५मध्ये तिने पहिली बीगबजेट फिल्म हॅकरमधून भुमिका साकारली..१९९९मध्ये गर्ल इंटरप्टेड या चित्रपटासाठी अँजेलीनाला सर्वौत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला..टॉम्ब रायडर हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला....द क्रेडल ऑफ लाईफच्यामाध्यमातून तिने हॉलीवूडच्या प्रस्थापित अभिनेत्रीमध्ये जागा मिळवली...मिस्टर अँड मिसेस स्मित या एक्शन - कॉमेडीपटातूनं तिचं वेगळं रुप प्रक्षकांना पहायला मिळालं..तर वॉन्टेडच्य