देवदूत!

हिमालयाच्या शिखरांचं त्यांना आव्हान ! काळ्याकुट्ट ढगांनी रोखला त्यांचा मार्ग ! बेभान वा-यानं आणला अडथळा ! पण त्या शूरवीरांना कोणीच रोखू शकलं नाही !

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 27, 2013, 12:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
उत्तराखंडमध्ये महाप्रलय आल्यानंतर जी परिस्थीती निर्माण झाली ते न भूतो न भविष्यती अशीच होती..हजारो लोक डोंगराळ प्रदेशात अडकले होते..त्यांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्याचं मोठं जिकरीचं काम होतं..कारण निसर्गाचं मोठं आव्हानही होतं....पण लष्कर,नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स आणि आयटीबीपीच्या जवानांनी ते लिलया पेललं...
नुकताच उत्तराखंडमध्ये महाप्रलायला आला....
निसर्गाच्या रौद्ररुपापुढे माणूस हतबल ठरला...
मोठ्याप्रमाणात प्राणहानी झाली...
हजारो भाविक ठिकठिकाणी आडकले....
हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मृत्यूने तांडव घातलं होतं...
हजारो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता...
ठिकठिकाणी अडकलेले लोक मदतीसाठी धावा करत होते ...
उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि बचावकार्य सुरु झालं....
लष्कर,नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स आणि आयटीबीपीच्या जवानांवर बचावकार्याची जबाबदारी सोपवण्यात आली...
प्रतिकुल हवामानात जीवाची परवा न करता हे जवान हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये दाखल झाले... या जिगरबाज जवानांनी हाजारोंना मृत्यूच्याखाईतून सुखरुप बाहेर काढलं...
मंगळवारी नेहमीप्रमाणे बचावकार्य सुरु होतं...
हेलिपॅडवरुन MI-17 V-5 हे वायुसेनेचे हेलिकॉप्टर आकाशात झेपावलं मात्र गौरीकुंडच्या परिसरात ते कोसळलं....या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीस जवान शहिद झाले... निसर्गाचं मोठं आव्हान असतांना लष्कराचे जवान मागे हटले नाहीत... उत्तराखंडच्या विविध भागात आजूनही मोठ्याप्रमाणात लोक आडकले असून त्यांची सूटका करण्याचं काम हे शूर जवान जीवाची परवा न करत आहेत...
उत्तराखंडमध्ये महाप्रलयाने थैमान घातल्यानंतरही नैसर्गिक संकट टळलं नव्हतं..डोंगर, पाऊस, ढगाळ हवामान अशा चोहोबाजूने संकट असतांनाही तिथ अडकलेल्या लोकांना एक आशेचा किरण दिसला...

ते देशाच्या सीमेच रक्षण करतात !
जीवाची परवा न करता वाचवले हजारोंचे प्राण !
उत्तराखंडमध्ये उतरली हेलिकॉप्टर्सची फौज !
पर्वतांवर धोकादायक लँडिंग !
विध्वंसाचे दहा दिवस, हजारोंच्या जीवाचा प्रश्न !
पाऊस आणि ढगांशी त्यांचा सामना !
ते आहेत भारतीय वायुसेनेचे शूर जवान !

उत्तराखंडवर संकट कोसळं होतं...निसर्गाने रौद्ररुप धारण केलं होतं...ढगफूटी झाली...महाप्रलय आला...नद्यांना पूर आला..जणू संकंटांनी उत्तराखंडला चोहोबाजूने वेढाच घातला होता...त्या महाप्रलयाने समोर येईल त्याला वाहून नेलं...चारधाम यात्रेसाठी आलेले हजारो भाविक ठिकठिकाणी आडकले होते..आपले प्राण वाचणार की नाही ? आपल्याला या संकट्तून कोण वाचवणार ? कोण मदतीचा हात देणार ? अशी भीती तिथं अडकलेल्या प्रत्येकालाच वाटत होती...पण त्याचवेळी त्यांना आकाशातून एक आशेचा किरण दिसला...काळ्याकुट्ट ढगांना छेदत भारीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरची फौज उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशात दाखल झाली.. उत्तराखंडमध्ये नद्यांनी थैमान घातलं होतं...सगळं काही पूराने गिळंकृत केलं होतं...हिमलायाच्या पर्वातांनी साथ सोडली होती...ठिकठिकाणी रस्ते खचले होते...केवळ हवाईमार्गचं बचावाचा एकमेव पर्याय समोर दिसत होता...गगनभेदी डोंगर, काळेकुट्ट ढग...मुसळधार पाऊस..कडाडणा-या विजांनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्सचा मार्ग रोखला होता...मात्र भारतीय वायुसेनेच्या जवानांचा विश्वास अटळ होता....
एमआय-१७ हे हेलिकॉप्टर भारतीयू वायू सेनेचा कणा म्हणून ओळलं जातं.... वायू दलाचे अत्यंत भरवशाचे, सैनिकांची ने-आण करणारे, लष्करी माल वाहून नेणारे हेलिकॉप्टर म्हणून एमआय-१७ ओळखले जाते. भारतीय सैन्याची श्रीलंकेतील शांती सेना मोहिमा, कारगील युद्ध किंवा अगदी २६-११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरिमन हाऊसवर कमांडोना उतरवण्याची कारवाई असू दे या हेलिकॉप्टरने प्रत्येकवेळी आपलं महत्व सिद्ध केलंय...
व्ही.ओ.१...मुंबईवरील २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरीमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला...नरिमन हाऊसच्या गच्चीमध्ये कमांडोंना उतरवण्यात येणार होतं...त्यासाठी एमआय-१७ या हेलिकॉप्टरमधून कमांडोंना नरिमन हाऊसवर उतरवण्यात आलं होतं. या थरारक कारवाईमध्ये कमाडोंना उतरवतांना हेलिकॉप्टर स्थिर ठेवण्याचं मोठं आव्हानं होतं.या कसोटीच्या प्रसंगी एमआय-१७ ने आपली क्षमता सिद्ध केलीय... कारगीलचं युद्ध असो , काश्मिरमधील अतिरेकी कारवायांचा बिमोड असो की उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो भाविकांच्या सुटकेचं बचा