जय केदारनाथ

महाप्रलयापुढे झुकली नाही भाविकांची श्रद्धा ! चारधाम यात्रेचा महिमा मोठा ! भोलेनाथाच्या दर्शनाची भक्तांना ओढ !

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 25, 2013, 11:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला..किती प्रमाणात मनुष्यहानी झाली याचा अंदाज लावणं सध्यातरी शक्य नाही..मात्र या महाप्रलयाने देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चारधाम तिर्थस्थळांचं मोठं नुकसान केलंय...शेकडोंचे प्राण गेले, मालमत्तेचं नुकसान झालं तसेच लाखो लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागलाय..निसर्गाने तांडव केलं असलं तरी लोकांचा इश्वरावरची श्रद्धा जराही कमी झाली नाही..पण सुरुवातीला आपण पहाणार आहोत चारधाम पैकी गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थिती..
उत्तराखंडमध्ये गेल्या रविवारी आलेल्या महाप्रलयाने सगळं काही उध्वस्त केलं.... महाप्रलयाच्या तडाख्यातून चारधामही सूटू शकलं नाही.. चारधामची यात्रा करण्यासाठी येणारे भाविक आपल्या यात्रेची सुरुवात यमुनोत्रीपासून करतात..आणि नंतर गंगोत्रीमध्ये गंगामातेचा आशीर्वाद घेत गंगेत स्नानकरतात..गंगेत स्नान केल्यास पापापासून मुक्ती मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे...पण यापुढे इथं चारधामयात्रेसाठी येणा-या भक्तांना काही काळ वाट पहावी लागणार आहे..कारण महाप्रलय येवून सात दिवस उलटले तरी आजही हजारो लोक या परिसरात अडकले आहेत..उत्तरकाशी ते गंगोत्री या दरम्यान असलेला राजमार्ग अद्यापही वाहतूकीसाठी खुला करण्यात आला नाही..हा राजमार्ग आठ ठिकाणी खचला आहे..तसेच यमुनोत्री राजमार्गही काही ठिकाणी खचला असल्यामुळे त्यावरही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे..त्यामुळे इथ अडकलेले लोक पायी बडकोटकडे जात आहेत..या परिसरात आजही अडीच हजार लोक ठिकठिकाणी अडकले आहेत....अडकलेल्या लोकांना येथून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे..आजारी लोकांना जॉली ग्रँटमध्ये हलवण्यात येत आहे..महाप्रलयाला आठव़डा उलटून गेला तरी प्रशासनाला उत्तरकाशी ते गंगोत्री दरम्यान तसेच बडकोट ते यमुनोत्री दरम्यान अडककलेल्यांपर्यंत पोहचण्यात यश आलं नाही..भागिरथीहटीच्या हस्तीगावाचा जगाशी संपर्क तुटला आहे...इथ अडकलेल्या लोकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल आहेत....मिळेल त्यावर गुजरान करण्याची वेळ अडकलेल्या लोकांवर आली आहे..पण असं असलं तरी लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही..यंदा नाही तर पुढच्या वर्षी चारधाम यात्रा करण्याचा अनेकांचा मानस आहे..
चारधाममध्ये गंगोत्री हे दुसरं धाम म्हणून ओळखलं जातं..उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात भागिरथी नदीच्या काठावर गंगोत्री हिमालय पर्वतरांगांमध्ये ३१ हजार मीटर उंचीवर हे तिर्थस्थळ वसलं आहे..हिंदूसाठी अत्यंत पवित्र असलेली गंगा नदी याच ठिकाणी धरतीवर अवतिर्ण झालीय..केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक गंगेच्या दर्शनासाठी इथं येतात..
गंगेविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात तसेच पुराण आणि धर्मिक ग्रंथांमध्येही गंगेचा उल्लेख आढळतो...पर्वतांचा राजा हिमवान याची गंगा ही मुलगी असून जो गंगेत स्नान करतो तो पवित्र होतो अशी हिंदूंची श्रद्धा आहे...भगवान विष्णूच्या पायातून गंगा निघते त्यामुळे तिला विष्णूपती म्हटलं जातं..गंगोत्रीमध्येच पवित्र गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते... राजा भागिरथाच्या कठोर तपस्येनंतर गंगा शंकराच्या जटातून निघाली आणि ती पृथ्वीवर प्रवाहीत झाली..गंगेच्या या पवित्र प्रवाहाला भागिरथी नावानेही ओळखलं जातं..या परिसरात एक मंदिर असून ते आठराव्या शतकात बांधण्यात आलं आहे..महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी याच गंगोत्री मध्ये देव यज्ञ केला होता....थंडीत हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादीत असतो..त्यामुळेच दिवाळीनंतर गंगोत्रीधाम पुढच्या सहा महिन्यासाठी बंद ठेवण्यात येत.. मे महिन्यात ते पुन्हा उघडण्यात येत...या मंदिरात पुजा तसेच देखभालीचं काम सेनवाल कुटुंबाकडून केलं जातं..गंगोत्रीमध्ये १९ किलोमीटर अंतरावर गोमुख असून ते गंगेचं उगमस्थान मानलं जातं..सूर्यवंशी राजा भगिरथाच्या तपस्येमुळे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरीत झालेल्या गंगेच्या दर्शनासाठी आजही लाखो भाविक दरवर्षी इथं येत असतात..
उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला डोंगर खचले ,घरे आणि कुटुंब उध्वस्त झाले ..मात्र लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही..महाप्रलयामुळे गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थीती अत्यंत गंभीर बनली आहे..पण आजही यमुना आणि गंगेचं दर्शन करण्याची अनेकांची इच्छा आहे. उत्तराखंडमधील यमुनानदीवर यमुनोत्री हे तिर्थस्थळ वसलं असून गढवाल परिसरात ते ४ हजार ४२१ मीटर उंचीवर आहे...खरं तर यमुनानदीचं उगमस्थान हे २० हजार ९५५ फूट उंचावर यमुनोत्री ग्लेशीयरमध्ये आहे...हे ग्लेशीयर हिलमालयातील बंदर पुछ कड्या जवळ आहे..यमुना नदीच्या तिरावर यमुनेचं मंदिर आहे..हे मंदीर टीहरी गढवालचा राजा प्रतापशा