एक होती टीम अण्णा !

आंदोलनाचा पूर ओसरला खरा पण किती जमीन ओली झाली याचं उत्तर टीम अण्णाकडही नाही.. कारण टीम अण्णा आता दुभंगलीय....

Updated: Sep 22, 2012, 12:13 AM IST

www.24taas.com, मुंबई
का दुभंगली टीम अण्णा ?
राजकीय महत्वाकांक्षेने केला घात ?
सामाजिक चळवळीचं कसं झालं नुकसान ?
काय असेल आंदोलनाचं भवितव्य ?
एक होती टीम अण्णा !

आंदोलनाचा पूर ओसरला खरा पण किती जमीन ओली झाली याचं उत्तर टीम अण्णाकडही नाही.. कारण टीम अण्णा आता दुभंगलीय.... अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग आता मोकळे झालेत.... अण्णांनी तसं स्पष्टपणे सांगितल्यानं केजरीवालही हैराण आहेत.... अण्णांशिवाय टीमचं भवितव्य काय असेल याची चर्चाही त्यामुळे रंगू लागलीय.... जनलोकपाल आंदोलनाचा पूर ओसरल्यानंतर टीम अण्णांनी काय साधलं? असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर अण्णांच्या या प्रतिक्रीयेत आहे...भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या उद्देशातून जनलोकपालचं आंदोलन उभारण्यात आलं...कधी जंतरमंतर तर कधी रामलीला मैदानावरुन सरकारला खंडीत पडकण्याचा प्रयत्न केला गेला...राजकारणात मुरलेल्य़ा काँग्रेस नेत्यांनी टीम अण्णाला चांगलंच खेळवलं...आणि आपल्याला जे हवं तेच केलं...या दरम्यान टीम अण्णामध्ये बरचं काही घडलं...आता तर टीम अण्णाही इतिहास जमा झालीय... आणि अण्णा आणि त्यांच्या अलिकडच्या काळातील सहकार्यांमधले संबंधी पूर्वी सारखे राहिले नाहीत..
टीम अण्णाचा विषय निघताच अण्णा उद्विग्न होतात.. भ्रष्टाचाराविरोधात देशात सर्वात मोठ्या आंदोलनाचं रणशिंग फुंकणारे अण्णा हजारे आणि या आंदोलनाचा ब्रेन मानले गेलेले अरविंद केजरीवाल यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. यात आता काही शंका राहिली नाही, ना कोणतंही प्रश्नचिन्हं.... राजकीय पर्यायाला भ्रष्टाचाराच्या समस्येवरचा इलाज मानण्यास नकार देत अण्णांनी केजरीवालांशी नातं तोडलंय... पण अण्णांनी आधीच टीमशी फारकत घेतलीय.... त्यामुळे अण्णांच्या टीमचे अन्य सदस्य आता काय करणार याचीही उत्सुकता आहे... सहका-यांकडून अपेक्षाभंग झाल्यानेच अण्णांनी आपला वेगळा रस्ता निवडला आहे काय ? आणि देशाला राजकीय पर्याय देण्याचा दावा करणा-या केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीला अण्णांशिवाय जनसमर्थन मिळू शकेल का ? असे प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेत.... टीम अण्णा का फुटली ? टीम अण्णाला कोणी फोडलं ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत....

असं काय घडलंय की अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या संबंधांवर उत्तरच मिळू नये..... असं काय घडलंय की दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्यात.... दोघांनीही देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची शपथ घेतली होती.... दोघंही देशाला नवी दिशा देण्याचा दावा करत होते..... दोघांच्या एका आवाजानं देश भ्रष्टाचाराविरोधात लढ्यासाठी उभा राहिला.... मग असं काय घडलं की अण्णा आणि केजरीवाल यांना वेगवेगळा मार्ग पत्करावा लागला ? अण्णा म्हणतात सगळं दिवसाढवळ्या घडलं, काही लपूनछपून नाही.... टीमपासून का दूर गेले अण्णा ? काय आहे पहिली शक्यता ? टीम केजरीवालच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे ? जंतरमंतरवर ज्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन्याची घोषणा केली, तेव्हा देश आवाक झाला....
आणि जेव्हा खुद्द अण्णांनीच राजकीय पर्याय देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं तेव्हा आणखीच आश्चर्य वाटलं.... दुसरी शक्यता अशी आहे की अण्णा आणि बाबा रामदेव यांच्या जवळीकीमुळे टीममध्ये दरी निर्माण झाली असावी.... रामलीला मैदानात जेव्हा पहिल्यांदा रामदेव अण्णांच्या मंचावर दिसले तेव्हा बाबा आणि अण्णा नवी ताकद बनतील असा अंदाज बांधला गेला.... पण लवकरच रामदेव आणि टीम अण्णामध्ये मतभेदांच्या बातम्या आल्या.... रामदेवांना भेटण्यास अण्णा सहका-यांसह हरिद्वारला गेले पण टीमबाबत बाबांची नाराजी समोर आली..... तिसरी शक्यता अशी आहे तो टीम दिल्ली आणि टीम राळेगणमधला संघर्ष..... दिल्ली आणि राळेगणमधलं अंतर आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या टीम असणं अण्णा आणि केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण होण्यात कारणीभूत ठरलं ? अण्णा दिल्लीत जाताच टीमच्या दबावाखाली निर्णय घ्यावे लागले अशी चर्चा अनेकदा झाली....

राळेगणमधल्या अण्णांच्या जुन्या सहका-यांची नाराजी अनेकदा समोर आली.... आंदोलनातील पैशांच्या हिशोबावरून अण्णांनी जाहीर कानपिचक्या दिल्या..... अण्णांच्या सहका-यांवर अनेक आरोप केले गेले पण अण्णा मात्र स्वच्छ राहिले.... त्या