www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘वॉरशीप’ कधीच नष्ट होत नाही, हे म्हणणं आहे भारतीय नौदलाचं... १९९७ साली भारतीय नौदलातून आयएनएस विक्रांत रिटायर्ड झालं होतं. मात्र आता ‘आयएनएस विक्रांत’ दुसरं पुन्हा एका नव्या अंदाजात भारतीय नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झालंय.
स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरियर २०१८ मध्ये जेव्हा इंडियन नेव्हीत दाखल होईल तेव्हा तीचं चित्र हे काहीसं असं असेल...
- तीची लांबी २६२ मीटरच्या आसपास असेल आणि वजन असेल चाळीस हजार टन...
- एवढ्या अवाढव्य आकारातही याचा वेग असेल ३० नॉट्स म्हणजे ५२ किलोमिटर प्रती तास...
इंडियन नेव्हीचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. खरंतर भारतानं एक लहान एअर डिफेंस शीप बनवण्याची तयारी केली होती. मात्र, सुरूवातीपासूनच असा निर्णय घेण्यात आला की हे एक विमानवाहू जहाज असेल. हे जहाज बनवण्यासाठी लागणारं स्टील रशियातून आणण्याऐवजी भारतातच बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय नौदलासमोर हे एक मोठं आव्हान होतं. मात्र त्यांनी ते अगदी सहज पूर्ण केलं.
भारतीय नौदल अनेक वर्षांपासून तीन ‘कॅरियर बॅटल ग्रुप’ म्हणजे सीबीजी तैनात करण्याच्या तयारीला लागला होता. कोणतीही विमानवाहू नौका समुद्रात एकटी जात नाही तिच्यासोबत युद्ध नौकांचा एक ताफादेखील असतो. ज्यात ‘डिस्ट्रॉयर फ्रिगेड’सोबतच मिसाईल्स बोट्ससारखे जहाजही असतात. सोबतच पाणबुड्यादेखील असतात. हा संपूर्ण ताफा म्हणजे सागरातला एक किल्लाच असतो. भारतानं बनवलेल्या ‘विराट’ सोबतच रशीयातून घेतलेलं ‘विक्रमादित्य’ हे विमानवाहू जहाजही भारतीय नौदलात लवकरच सामील होणार आहे. २०१८ मध्ये भारताकडे असे तीन एअरक्राफ्ट कॅरिअर असतील. शेजारील देशांचा विचार केला तर या ‘सीबीजी’मुळे भारतीय नौदलाला मोठी ताकत मिळणार आहे.
अशी विमानवाहू नौका तयार करण्याच्याबाबतीत पाकिस्तान अजून शेकडो मैल दूर आहे. मात्र, चीनचा २०२० चा प्लान भारतासाठी मोठं आव्हान देणारा आहे. चीन वेगानं आपल्या नौदलाची ताकद वाढवतंय. नुकतंच चीनने रशियकडून एक छोटी विमानवाहू नौका खरेदी करून ती समुद्रात उतरवलीय. २०२० मध्ये चीन तब्बल तीन सीबीसी तैनात करण्याच्या तयारीत आहे. नुकतंच भारताच्या ‘आयएनएस अरिहंत’ या पाणबुडीनं जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलंय. त्यात आता लवकरच विक्रांतचाही भारतीय नौदलात समावेश होणार आहे. भारतीय नौदलाची प्रगती अशाच वेगात होत राहिली तर भारताला चीनचं आव्हान पेलणं सहज शक्य होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.