www.24taas.com, मुंबई
2012चं क्रीडा क्षेत्राचा वेध घेताना सर्वात अगोदर लक्षात येतं ऑलिम्पिक... 2012मध्ये क्रिकेटमध्ये भारताची सुमार कामगिरी झाली असली तरी ऑलिम्पिकमध्ये भारतानं मोठी झेप घेतली.... भारतानं ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी करताना 6 मेडल्सची कमाई केली...
ऑलिम्पिक... खेळांचा महाकुंभ... जगभरातील देशांना आपली सत्ता आणि ताकद दाखवण्याची चार वर्षातून मिळणारी एक संधी .2012मध्ये 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये जगातील सर्व दिग्गज प्लेअर्स आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मैदानात दिसले...एकविसाव्या शतकात जगासमोर महासत्ता बनून उभ्या ठकलेल्या भारतानेही ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीत लक्षणीय प्रगती केली लंडन ऑलिम्पिकपूर्वीच्या कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये एखाद्या मेडलची कमाई जरी झाली तरी ते विशेष मानलं जातं. मात्र, लंडनमध्ये भारतीय योद्धांनी जगाला आपली ताकद दाखवली.भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात रेकॉर्ड तोड सहा मेडल्सची कमाई केलीय.
मेडलचा श्रीगणेशा केला शूटर गगन नारंगने. 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगनने ब्राँझ मेडलची कमाई केली आणि भारताचं खातं उघडल. त्यानं 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतालं लंडनमधील पहिलं मेडल मिळवून दिलं. नारंगनंतर आर्मी मॅन विजय कुमारनंही मेडलचा वेध घेतला. त्यानं 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल प्रकारात कमाल करत सिल्व्हर मेडलवर आपलं नाव कोरलं.
शूटर्सनंतर भारताला सर्वाधिक अपेक्षा होत्या त्या फुलराणी सायना नेहवालकडून... सायना नेहवालनं चीनी ड्रॅगनच्या मक्तेदारीला जोरदार टक्कर दिली. लंडनमध्ये ब्राँझची कमाई करत सायनाने आपल्या बरोबरच कोट्यावधी भारतीयांचही स्वप्न पूर्ण केलं.
सायनाच्या मेडलनंतर भारत बीजिंगपेक्षा सरस कामगिरी करणार हे निश्चित झालं होतं. कारण मेरी कोमनं बॉक्सिंगची सेमी फायनल गाठली होती. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंग पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांच्या मनगटाची ताकद मेरीनं जगाला करुन दिली. मेरीनं भारताला अजून एका ब्राँझ मेडलची कमाई करुन दिली.
कुस्तीमध्ये भारतानं दोन मेडल मिळवले..60 किलो फ्रिस्टाईलमध्ये योगेश्वर दत्तने जबरदस्त कामगिरी करताना भारतला अजून एक ब्राँझ मेडल मिळवून दिलं.तर लढवय्या सुशीलकुमारनं भारताला दुसरं सिल्व्हर मिळवताना भारताला सहावं मेडल मिळवून दिलं. भारताचं लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणारा आणि दोन्हीही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडलची कमाई करणारा सुशील कुमार पहिला आणि एकमेव भारतीय ठरला.
लंडन ऑलिम्पिक गाजवलं ते जमैकनं स्प्रिंटर उसेन बोल्टनं....पुन्हा एकदा पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान मानव होण्याचा पराक्रम त्यानं केलाच शिवाय 200 मीटर शर्यत जिंकताना त्यानंतर 4 इनटू 100 मीटर रिले नव्या विक्रमासह गोल्ड मेडल पटकावताना त्यानं लंडन ऑलिम्पिक गोल्डन हॅट्ट्रिक साधली.
मायकल फेल्प्सनं करिअरच्या तिस-या ऑलिम्पिकमध्ये मेडल्सची घौडदैड कायम राखली.लंडनमध्ये 4 गोल्ड आणि 2 सिल्व्ह मेडल्सची कमाई करताना ऑलिम्पिकमध्ये तब्बल 22 मेडल्सची पटकावण्याचा अजेय विश्वविक्रम केला..यात 18 गोल्ड 2 सिल्व्हर आणि 2 ब्राँझचा समावेश आहे....
ऑलिम्पिकच्या इतिहासात लंडन ऑलिम्पिक हे भारतासाठी सर्वात यशस्वी आणि प्रेरकही ठरलं. बीजिंगच्या तुलनेत मेडलचा आकडा दुप्पट असला तरी भारताच्या लोकसंख्याच्या तुलनेत हे यश फारच मर्यादीत आहे. अगदी 1 लाख लोकसंख्या असलेला जगाच्या नकाशावर टिंबसारख्या दिसणा-या ग्रेनेडासारखा देशानं गोल्ड मिळवलं तर 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र गोल्डशिवाय परतावं लागलं..एकीकेड अमेरिका, चीन, रशिया, ग्रेट ब्रिटनं या विकसीत देशांनी मेडल्सचा वर्षाव केला तर महासत्ता होण्यासाठीचा दावा करणाऱ्या भारताचं सुवर्णस्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीयांनी आपल्या कामगिरीत नक्कीच सुधारणा केलीय. मात्र, आपल्याला अजून बरिच मेहनत करावी लागणार आहे.
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये तिरंगा डौलानं फडकावला.. मात्र वर्षाअखेरीस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीनं आयओएवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भारताची नाचक्की झालीच....तर चेसमध्ये विश्वनाथ आनंद आणि आर्चरीमध्ये दिपिका कुमारीनं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला...
1. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या नियमांचं उल्लंघव केल्यामुळे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनवर निलंबनाची कारवाई याचवर्षी ओढवली. जोपर्यंत आयओसीच्या नियमांनुसार आयओए निवडणूक घेणार नाही तोपर्यंत नि