तिच्या हिमतीनं गुन्हा उघड, पण कारवाई...

लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 12:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
लिंगनिदान आणि गर्भपात याबाबत राज्य शासनानं कठोर पाऊल उचललं मात्र तरीही नाशिक शहरात अनधिकृतपणे गर्भपात केले जात असल्याच समोर आलंय. गर्भपात करण्यात आलेल्या महिलेनंच याबाबत तक्रार केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. याबाबत नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी डॉक्टरला अटक का केली नाही याबाबत शंका आहे.
त्रिंबकजवळच्या तलवाडे शिवारात राहणारी ही सोनाली, गेल्या वर्षी तिचं लग्न इगतपुरीजवळच्या खबाळ्यातल्या अशोकशी झालं. सोनालीला दिवस गेल्यानंतर माहेरी सासरी सर्वत्र आनंदी आनंद असताना सोनालीच्या पतीनं आणि सासूनं डॉक्टरकडे शारीरिक तपासणी करताना घोटीला एका दवाखान्यात तिची गर्भनिदान चाचणी केली. त्यानंतर ते तिला गर्भपात करवून घेण्याच्या मागे लागले. सोनालीनं जबर विरोध करून हट्ट परतवून लावला. अखेर नाशिकच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये तिला दाखल गर्भाच्या तापसणीसाठी गोडीगुलाबीनं दाखल करण्यात आलं. बेशुद्ध करून तिच्या संमतीविनाच तिचा गर्भपात बेकायदेशीरपणे करण्यात आला.
याबाबत सोनालीनं पोलिसांना तक्रार केली असता चार दिवस तक्रार घेण्यासाठी लावण्यात आले. कुटुंब अडून बसल्यानं तक्रार घेतली मात्र अडीच महिने उलटूनही अद्याप डॉकटर मोकळाच आहे. व्हीजीलास कमिटीनं याबाबत डॉक्टर गोरेंना दोषी मानलं असूनही पोलीस केवळ कागदावरील कारवाई करण्यात समाधान मानत आहेत.
धाडसी सोनालीने हिम्मत दाखविल्यानं शहरात चालणारा हा प्रकार उघड झाला आहे. यामुळं तिला आज माहेरी परतावं लागलं असलं तरी या विरोधात ती उभी राहिल्यानं नाशिक शहरात पहिल्या वाहिल्या केसची नोंद झाली आहे. अशा असंख्य कुटुंबातील विवाहितांनी अशीच हिम्मत दाखवून भ्रूणहत्या थांबविण्याची गरज आहे.
पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.