नेत्यांचा आखाडा

देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 5, 2012, 10:16 PM IST

www.24taas.com,मुंबई
दिल्लीतील संसद असो की राज्यातील विधिमंडळ या जनतेच्या हितीचे निर्णय घेण्याची जबाबदारी घटनेनं या सभागृहांना दिली आहे. त्यामुळेच या सभागृहांना लोकशाहीत महत्वाचं स्थान आहे. पण कधी-कधी हेच सभागृह जणू कुस्तीचा आखाडा असल्या सारखे वाटतात. बुधवारी राज्यसभेत हाच अनुभव देशातील जनतेला आला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.
उत्तरप्रदेशच्या विधानसभेत बजेट सत्राच्या पहिल्याच दिवशी हातघाईची परिस्थीती होती.. हातात बॅनर आणि डोक्यावर टोप्य़ा घालुन बसपाचे आमदार निषेध करत होते. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान बसपाच्या आमदारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली.सभागृहात आमदारांना बसण्यासाठी असलेल्या टेबल खुर्च्यांवर चढून आमदार जोरजोरात निदर्शनं करत होते.
हळूहळू घोषणा बाजी वाढत गेली.. आणि पुढं त्याला हुल्लडबाजीचे स्वरुप आलं .. बसपाच्या आमदारांचा गोंधळ काही थांबता थांबता नव्हत..त्या गोंधळी आमदारांनी थेट सभापतींच्या आसनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.. मार्शलनी त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला..पण बसपा आमदारांचा गोंधळ काही थांबता थांबत नव्हता.. त्यांनी थेट राज्यपालांच्या आसनाकडे कागद फेकायलाही सुरुवात केली...आपल्या क़ृत्या बद्दल त्यांना कोणताच खेद वाटला नाही. सभागृहात झालेला हा गोंधळ संसदीय कार्यपद्धतीला जराही शोभणारा नव्हता..या गोंधळानंतर बसपाच्या आमदारांनी सभात्यागही केला.. या गोंधळानंतर सत्ताधारी पक्षाने बसपा विरुद्ध हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी हे एकमेकांचे कट्टर वैरी आहे. दोन्ही पक्षाचे नेते नेहमी एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतांना दिसतात..त्या दिवशीही तोच प्रकार घडला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बसपानं सत्ताधारी समजवादी पार्टीला आपली ताकद दाखवून दिली होती..मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारच्या विरोधात हल्लाबोल करण्यासाठी बसपानं आक्रमक भूमिका घेतली , पण त्यावेळी आपण रस्त्यावर नाही तर सभागृहात याचं भान त्यांना उरलं नव्हतं.

संसद आणि विधिमंडळ ही लोकशाहीचे मंदिरं आहेत..आणि त्याचं पावित्र्य जपलं गेलं तरच लोकशाही टिकणार आहे...पण कधी कधी लोकप्रतिनिधींना त्याचा पुरता विसर पडतो...महाराष्ट्राच्या विधीमंडळातही असाच प्रसंग घड़ला होता त्याला आता तीन वर्ष उलटून गेलीत...मराठीतून शपत घेण्याच्या मुद्दावरुन मनसे विरुद्ध सपा आमदार अबु आझमी यांच्यात तो वाद रंगला होता...आणि हिंदीतून शपत घेण्याचा अट्टहास करणा-या आझमींना त्याची किंमतही मोजावी लागली होती.
ही घटना आहे तीन वर्षांपूर्वीची.महाराष्ट्राच्या विधीमंडळात मनसे विरुद्ध समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी असा सामना रंगाला होता....सा-या देशानं तो सामना बघितला खरा. पण या संघर्षाचं रणशिंग फुंकलं होतं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर विधिमंडळात काय होणार याचा सर्वानाच अंदाज आला होता.. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे आमदार सभागृह डोक्यावर घेणार याची चुनूक ते विधिमंडळ परिसरात दाखल होताच दिसून आली होती. कारण घोषणा देतच मनसे आमदारांनी विधिमंडळ सभागृहात प्रवेश केला होता....मराठीतून शपत घेण्याचं राज ठाकरेंनी केलेलं आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धुडकावून लावत हिंदीतून शपत घेण्यास सुरुवात केली.पण त्यांचा तो हट्ट त्यांना चांगलाच महाग पडला.
मराठीतून शपत न घेतल्यास माझे आमदार काय करतील ते विधिमंडळ भवन पाहील असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता...आणि त्यांचा तो इशारा त्यांच्या आमदारांनी खरा करुन दाखवला...मनसे आमदारांनी विधानभवांनाचा अक्षरश: आखाडा करुन टाकला होता.. अबु आझमी हिंदीतून शपत घेत असतांनाच दिवंगत आमदार रमेश वांजळेंनी त्यांचा पोडियम पाडून टाकला तसेच आझमींच्या हातात असलेला माईक हिसकावून घेतला..त्यामुळे भडकलेल्या आझमींनी मनसे आमदारांना चप्पल दाखवली.पण त्यानंतर जे काही घडलं ते मोठं धक्कादायक होतं.. मनसेचे आमदार राम कदम यांनी अबु आझमींच्या श्रीमुखात लगावली...त्यावेळी मनसे आमदार शिशिर शिंदे आणि रमेश वांजळेही आघाडीवर होते...तो प्रकार पहून सगळ सभागृह हाबकुन गेल होते.. मराठी विरुद