प्राईम वॉच - जगातील सर्वात मोठी चोरी

ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या या हिरे चोरी प्रकरणाचा तपास बेल्जियम पोलिसांकडून केला जात असून, एकएक माहिती आता उघड होवू लागली आहे.

Updated: Feb 23, 2013, 12:08 AM IST

www.24taas.com, मुंबई
ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या या हिरे चोरी प्रकरणाचा तपास बेल्जियम पोलिसांकडून केला जात असून, एकएक माहिती आता उघड होवू लागली आहे...चोरट्यांनी ज्या पद्धतीने अवघ्या तीन मिनिटात ती चोरी केलीय ती पहाता त्यांनी मिलिटरी ट्रेनिंग घेतलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे...या चोरीसाठी आरोपींनी अत्याधुनिक शस्त्र तसेच लेजर साईटचा वापर केला होता... बेल्जियममधील हे ब्रुसेल्स विमानतळवर झालेल्या या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या हि-यांच्या चोरी प्रकरणाचा तपास बेल्जियम पोलिसांकडून केला जात आहे...विमातळावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात चोरांचा कारनामा कैद झाला आहे...मात्र त्यांनी तोंडावर बुरखा घातला असल्यामुळे त्यांची ओळख पटण्यात अडचणी येत आहे..त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेच धागेदोरे लागले नाहीत.. आरोपींनी चोरी करण्यासाठी ज्या दोन वाहनांचा वापर केला होता त्यापैकी एक वाहन हे चोरी करण्यात आलं होतं...ब्रुसेल्स विमानतळावरुन हि-यांचे खोके पाठविण्यात येणार असल्याची माहिती आऱोपी टोळीला कोणी पुरवली याचा शोध घेण्याचा प्रय़त्न पोलिसांकडून केला जात आहे....तसेच काही महत्वाची माहिती आता उघड होवू लागली आहे...
चोरट्यांनी ज्या गेटमधून विमातळाच्या परिसरात प्रवेश केला होता ते बंद नसून तिथं बांधकाम सुरु होतं...आणि याची माहिती चोरट्यांना होती..त्यामुळेच त्यांना विमातळावर सहज प्रवेश करता आला... हि-यांनी भरलेले खोके सशस्त्र सुरक्षारक्षकांच्या तैनातीत विमानतळावर आणण्यात आले होते...ते खोके विमानतळावर उतरुन घेई पर्यंत चोरटे विमानतळाबाहेर वाट पहात होते... हिरे विमातळावर पोहोचल्यानंतर चोरट्यांनी आवघ्या तीन मिनिटात तो कारनामा केला....चोरट्यांनी ज्या पद्धतीने हिरो केलीय ती पहाता त्यांनी मिलिटरी ट्रेनिंग घेतलं असावं असा संशय व्यक्त करण्यात आलाय़.. चोरांच्या टोळीने ज्या हि-यांची चोरी केलीय त्यातील बहुतेक हि-यांना पैलू पाडलेले नव्हते..तसेच त्यापैकी ९० टक्के हिरे हे झुरीचमध्ये पैलू पाडल्यानंतर भारतात पाठविण्यात येणार असल्याचं आता समोर आलंय..अँटवर्प मधील या ब्रुसेल्स विमातळावरुन दररोज १३१ दशलक्ष पाऊंड किंमतीचे हिरे जगभर पाठविले जातात..... जगातील सर्वात मोठी हिरे चोरीची घटना आताच आपण बघीतलीय...पण मुंबईतही अशीच घटना तीन वर्षापूर्वी घडली होती...चौघा विदेशी चोरांनी मोठ्या चलाखीने हिरे लांबवले होते.. मुंबईच्या गोरेगावमध्ये आंतरराष्ट्रीय हिरे चोरांनी साडे सहा करोड रुपयांचे हिरे चोरुन खळबळ माजवली होती.. पण स्वताला हुषार समजणा-या त्या चोरांनी अखेर सीसीटीव्हीच्या फूटेजमुले दुबई विमानतळावर दबा धरुन बसलेल्या पोलिसांच्या हातकड्या घालून घ्याव्या लागल्या..
चार लोकांच्या या टोळीतील तीन सदस्य स्पष्ट दिसतायत आणि यात एक महिलाही सहभागी होती. मुंबई क्राईंम ब्रॅंचने दिलेल्या ठाम माहितीनुसार या चोरीत एखाद्या स्थानिक व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय हे काम तडीस नेण अशक्य होतं..जाणकारांच्या म्हणण्यानुसार 2010 सालच्या 17 ऑगस्टच्या दरम्यान हे चारही जण मुंबईला आले. आणि त्यांनतर 3-4 वेळा या सा-यांनी गोरेगाव एक्झीबिशन सेंटर तसच हिरे ठेवलेल्या त्या काऊंटर पर्यंत किमती हिरे ठेवण्यात आले होते त्याची रेकी करण्यात आली. मुंबईत आल्यावर चार आरोपींपैकी तीन आरोपी हे गोरेगावमधील एका हॉटेलात थांबले तर त्यातील चौथा आरोपी हा जुहूजवळच्या एका हॉटेलात थांबला होता. क्राईम ब्रॅंचच्या म्हणण्यानुसार ही सगळी चोरीची घटना दुपारी तीन वाजेपर्यंत घ़डली आणि त्यानंतर हे चोरटे शांतपणे हॉटेलवर गेले होते.
पोलिस चोरी झाल्यानंतर एक्झिबिशनमधील सिसीटीव्हीची तपासणी करत विमानतळावर सूचना देणार त्या पुर्वीच या चोरट्यांनी दुबईला जाणारं विमान पक़डलं होतं. पण त्याचवेळी मुंबई पोलिसांनी दुबई पोलिसांशी संपर्क साधला.. आणि या चोरट्यानी पकडण्यात आलं. खरतर मुंबई पोलिसांच्या विलक्षण चातुर्यामुळेच मुंबईतील या मोठ्या हिरे चोरीचा पर्दाफाश झाला होता..