www.24taas.com, मुंबई
मोबाईल फोनधारकांसाठी खूशखबर !
अनाहूत फोन कॉल्स -SMSपासून सुटका !
५ नोव्हेंबरपासून लागणार लगाम !
अनाहुत कॉल्सवर लगाम
देशातील ६० कोटीहून अधिक मोबाईल फोन धारकांसाठी ही खूषखबर आहे...पाच नोव्हेंबरपासून नको असलेले फोन कॉल्स आणि एसएमएस वेळीअवेळी तुमच्या फोनची घंटी वाजणार नाही..टेलीकॉम रेग्यूलेटर अर्थात ट्रायने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून त्यावर कडक अंमलबजावणी केली जाणार आहे... कधी बँकेचं कर्ज हवंय का ? म्हणून तर कधी वजन कमी करायचंय का ? अशी विचारणा करणारा अनाहूत फोन तुम्हालाही आला असले...पण अशा फोन कॉल्समुळे मोबाईल फोनधारकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो ...ज्यांना याचा अनुभव आलाय ते काय म्हणतात ते पहा.. दिल्लीच्या रहिवासी असलेल्या शिल्पी अरोरा यांच वजन आहे 50 किलो.. तुम्हाला त्यांच वजन सांगण्यामागचे कारण एवढच आहे की, शिल्पी यांना पाहून त्यांना आणखी वजन कमी करण्याची आवश्यकता आहे अस कोणाला तरी पटेल का? पण त्या ज्या कारणामुळे वैतागून गेल्या आहेत ते त्यांच्याक़डूनच ऐका.. गेल्या काही दिवसापासून शिल्पी यांच्या मोबाईलवर सतत वजन कमी करण्यासंदर्भातील एसएमएस येतायत..
शिल्पी यांच्या प्रमाणेच निधी अहूजा यांनाही त्या अनाहूत फोन कॉल्सचा वैताग आलाय.. टेलिकॉम रेग्युलरिटी ऑथरीटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायच्या नव्या नियमांमुळे शिल्पी आणि निधी यांच्यासारख्या कोट्यवधी मोबाईल धारकांना टेलिमार्केटिंगच्या नकोशा फोन कॉल्सपासून सुटका होणार आहे. पण नको असलेल्या कॉल्सपासून केवळ सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत अस नाही तर आमदार खासदारांपासून बड्या नेत्यानांही टेलिमार्केटींगचे वेळी अवेळी कॉल्स येत असतात.. कॉंग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही तो त्रास सहन केलाय.. टेलिमार्केंटिंगचे फोन कॉल्स आणि एसमेसच्या विरोधात 2005 साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने टेलिमार्केटिंग कंपन्याना चांगलच फटकारलं होतं.. पण त्यांचा टेलिमार्केटिंग कंपन्यावर कोणताच परिणाम झाला नाही.. ट्रायकडून येत्या पाच नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत... त्यामुळे अनाहूत एसमेस आणि कॉल्सपासून मोबाईल फोनधारकांची सुटका होणार आहे.. ट्रायच्य़ा या नव्या नियमांचे ग्राहकांनी स्वागत केलय.. पण काहींच्या मते टेलीमार्केटिंगमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी परदेशाप्रमाणे भारतातही कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे..
दोन कोटी २४ लाख हा आकडा आहे...मोबाईल ऑपरेटर्सकडं आलेल्या त्या अनाहूत फोन कॉल्सच्य़ा तक्रारीचा...केवळ ४ वर्षात एव्हड्या मोठ्याप्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत..यावरुन ही समस्या किती गंभीर बनत चाललीय हे तुमच्या लक्षात आलंच असेल.. नको असलेले फोन कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी ट्रायने वेळोवेळी पावलं उचलली खरी पण त्याचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही.. आज मोबाईल फोन हा अत्यावश्यक बनला आहे...गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल पहायला मिळतो...
पण रात्री-अपरात्री येणा-या टेलिमार्केटिंगच्या अनाहूत फोन कॉल्स आणि एसएमएसमुळे मोबाईल फोन धारकाला मनस्ताप सहन करावा लागतोय...हा मनस्ताप होवू नये म्हणून ट्रायने यापूर्वीच पावलं उचलली खरी पण त्यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे अनाहूत फोन कॉल्स येणं काही थांबलं नाही..मोबाईल फोन धारकांनी टेलिफोन ऑपरेटर्सकडं तक्रारींचा पाऊस पाडला पण त्याचा काही उपयोग झाला नाही..ट्रायने वारंवार नियम घालूनही मोबाईल फोनधारकांना दिलासा काही मिळाला नाही...अनाहूत कॉल्स आणि एसएमएसविषयी कुणाकडं तक्रार करायची याची माहिती ऑपरेटर्सकडून दिली जात नाही..त्यामुळे ग्राहकांचा संताप वाढत आहे.
प्रत्येक महिन्याला टेलिफोन ऑपरेटर्सकडं ग्राहकांकडून ५० हजार तक्रारी दाखल होतात..गेल्या ४ वर्षात ऑपरेटर्सकडं दोन कोटी २४ लाखांहून अधिक तक्रारींचा पाऊस पडला आहे... इतक्यामोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होऊनही केवळ काहीच तक्रारींची दखल घेतली गेली..गेल्या चार वर्षात ७३ हजार नोंदणीकृत टेलिमार्केटिंग कंपन्या तसेच १ लाख १२ हजार अनाधिकृत टेलिमार्केटिंग कंपन्यांवर कारवाई करण्यात आलीय..८७ हजार टेलिमार्केटिंग कंपन्यांना ५०० रुपये तर ४१ हजार टेलिमार्केटिंग कंपन्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय..