www.24taas.com, मुंबई
पृथ्वीवरचे धगधगते ९ प्रदेश !
जिथं आकाशातून बरसतो आग्नी !
जिथं सूर्य किरणामुळे भाजून निघतं अंग !
पृथ्वीवरचे धगधगते ९ प्रदेश !
जिथं आकाशातून बरसतो अग्नी !
जिथं सूर्य किरणामुळे भाजून निघते कातडी !
आज तुम्ही पहाणार आहात जगातील सर्वात उष्ण प्रदेश...जिथं आकाशातून रोज अग्नी बरसतो..जिथं रोज सूर्य आग ओकतो... तिथ राहणा-या लोकांचं अंग भाजून निघतलंय....जरा विचार करा ४० -४५ डिग्री तापमानात अंगाची लाहीलाही होते...पण आता तुम्ही जे ९ प्रदेश पहाणार आहात तिथलं तापमान ५० ते ७० डिग्री सेल्सियसच्या दरम्यान आहे..हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे की आणखी काही तो संशोधनाचा विषय आहे..पण या धगधगत्या प्रदेशात राहणा-या जनतेला मात्र प्रचंड गरम झळांचा सामान करावा लागतो..पृथ्वीवरील ती ९ ठिकणं आहेत...
उष्ण वातावरणातही लोक इथं राहतात हे विशेष..कसं आहे त्या लोकांच जीवन...कसा सामना करतात ते या उष्णतेचा ..हे देखील आपण काही क्षणातच पहाणार आहोत.. यंदाचा उन्हाळा हा अत्यंत कडक असल्याचं जगभरातील हवामान अभ्यासकाचं म्हणणं आहे..पण जर आपण सर्वात उष्ण परिसरात रहात आहोत असा जर तुमचा समज असेल तर हा स्पेशल रिपोर्ट बघीतल्यानंतर तो आपला गैरसमज आहे असं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही..
आफ्रिकेच्या इथिपियामधील हे डेनाफिल वाळवंट... इथं जगण कठीण आहे... या प्रदेशावर निसर्गाची अवकृपाच म्हणावी लागेल.. वर्षाचे ३६५ दिवस सूर्य इथं आग ओकत असतो.... सूर्याच्या उष्णतेचा असा तडाखा जगाच्या पाठीवर दुसरीकडं कुठंच पहायला मिळणार नाही..... इथल्या नागरिकांनी तब्बल ६१ अंश सेल्सीयस तापमानाचा सामना करावा लागतोय... ही नदी आहे असा जर तुमचा समज असले तर तो साफ चुकीचा आहे .. कारण या जमिनीतून सल्फरचे उष्ण प्रवाह वाहतात.. भूगर्भातून बाहेर पडतं उष्ण आणि पांढ-या रंगाचं सल्फरयुक्त पाणी... या भागात कोणतीही शेती पिकत नाही... पिकतं ते फक्त सल्फर... त्याला हात लावताक्षणी क्षणात हात पोळून निघतो..
इथल्या जमिनीतून सल्फर आणि अनेक प्रकारचे विषारी वायू सतत बाहेर पडत असतात. आणि म्हणूनच हा सारा भूभाग म्हणजे जणू विषारी वायूची ज्वालाग्रही भट्टी बनलाय..तंदूर भट्टी प्रमाणे भासणा-या या प्रदेशात मणुष्य जगण कठीण आहे...पण आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या प्रतिकुल परिस्थितीतही लोक इथे राहातात..खरतर ६१ डिग्री सेल्सीयस तापमानात तुम्ही तासभरही राहू शकणार नाहीत.. पण गेल्या अनेक वर्षापासून लोक पिंढ्य़ान पिढ्य़ा राहतात.. आफर जामातीच्या लोकांनी या वातावरणाशी जुळवून घेतलं आहे...इथं तयार होणारा सल्फर हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. इथ राहणा-या लोकांचा जवळचा साथीदार म्हणजे उंट.. कारण इथ उंटाशिवाय कुणीच जगू शकत नाही...
हा भूभाग विंचू आणि विषारी सापांनी भरलेला आहे...या प्रदेशाचं तापमान ६१ डिग्री सेल्सियस पर्यंत पोचण्यामागचं कारण आहे डलोल ज्वालामुखी.. डेनाफिल वाळवंटाच्या मध्यभागी डलोल ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी नेहमीच लाव्हा ओकत असतो..जेव्हा सूर्य थंड होईल तेव्हाच हा लाव्हा शांत होईल अशी दंतकथा या प्रदेशात सांगितली जाते...हा ज्वालामुखी किती भयानक आहे ते जरा निरखून पहा ... या ज्वालामुखीतून बाहेर पडणा-या लाव्हामुळे हा संपूर्ण प्रदेश अग्नीकुंड बनलाय.. ज्वालामुखीमूळे जणू या वाळवंटालाच भेग पडलीय असून ती एखाद्या कालव्याप्रमाणे भासते...या उष्ण वातावरणामुळे शेकडो किलोमीटरपर्यंत भूगर्भात उष्णता वाढतच चाललीय...ही भेग आभाळातूनही स्पष्टपणे दिसत असून तिला द ग्रेट आफ्रिकन रिफ्ट अस म्हटलं जातं.
वैज्ञानिकांचे अस म्हणणं आहे की, शेकडो वर्षानंतर ही भेग एव्हढी वाढत जाईल की ज्यामुळे आफ्रीकेतील देशाचं विभाजन होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय...या पार्श्वभूमीवर इथोपियासाठी डेनाफिल वाळवंट ही एक समस्या बनली आहे. पण निसर्गाच्या या रौद्ररुपापुढं माणूस कालही हतबल होता आणि उद्याही हातबल राहणार ...