माणसानं कसं दिलंय निसर्गाला आव्हान ?
आता माता-पित्यांशिवाय जन्माला येणार बाळ !
कसा होईल `त्या` बाळांचा जन्म ?
निसर्गाला आव्हान
भविष्यात आपत्याला जन्म देण्यासाठी स्त्री-पुरुषांची खरचं गरज उरणार नाही ? विज्ञानाने खरंच इतकी प्रगती केलीय की ज्याच्या मदतीने कृत्रिमरित्या मुलं जन्माला येवू शकेल... ब्रिटनच्या जेनेटिस्ट डॉ. आरती प्रसाद यांनी हा सिद्धांत मांडला आहे..माणसाच्या शरिरातील वाय क्रोमोझोम लुप्त होत असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे... एका शुन्यापासून सृष्टीची निर्मिती झाली आणि जवळपास चार अब्ज बर्षांत असंख्य ग्रह... तारे .... पृथ्वी आणि असंख्य जीव जंतूची निर्मिती झाली...पृथ्वीवर मानवाची निर्मिती कशा पद्धतीने झाली यावर वैज्ञानिकांमध्ये आजून एकमत नाही...त्यामुळेच मानवाच्या निर्मितीचं कुतुहल आजही कायम आहे....अनेक संशोधकांनी वेगवेगळे सिद्धांत आजवर मांडले आहेत...
इव्ह आणि एडमच्या संबंधमुळे मानवतेला सृष्टीचं महत्व पटलं...त्यानंतर जन्माला आलेल्या पिढ्यांनी समाजाचा पाया घातला आणि त्यातून आजचा आधुनिक समाज विकसीत झाला ... सुरुवातीचा मानव ते आजच्या युगातील प्रगत मानव हे अंतर पार करण्यासाठी माणसाला अनेक वर्षांचा कालावधी लागला आहे... ....याच काळात प्रेम,माया, नातेसंबंध , कुटुंब अशा विविध भावभावनांचे त्याला आज कांगोरे लाभले आहेत..
मानवाच्या प्रजोत्पादनाला कारणीभूत ठरलेले ते हळूवार संबंध आता मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे... होय....इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये अनुवंश विज्ञान विभागात संशोधक म्हणून काम करणा-या आरती प्रसाद यांनी आपल्या लाईक अ व्हर्जिन या पुस्तकात ही थेअरी मांडली आहे... महिला आणि पुरुषाविना आपत्य जन्माला येणार असल्याच आरती प्रसाद यांनी आपल्या थेअरीत मांडलं आहे..
त्याच्या म्हणण्यानुसार निसर्गाने हा कारनामा काही जीवजंतूंच्या बाबतीत अधीच करुन ठेवला आहे....स्त्री-पुरुषांच्या संबंधाशिवाय मुल जन्माला येणं ही बाब अशक्य वाटत असली तरी ते शक्य होणार असल्याचा दावा आरती यांनी केलाय...दोन कारणांमुळे ही बाब शक्य असल्याचा आरती यांना वाटतयं.. आरती यांनी ज्या दोन शक्यतांचा उल्लेख केला आहे त्या पैकी पहिल्या शक्यतेमध्ये Y क्रोमोझोमचा उल्लेख केला आहे. मानव विकास प्रक्रिये दरम्यान माणसाच्या डीएनएमध्ये आढळून येणारा Y क्रोमोझोम हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे...
खरं तर पुरुष जातीचं आपत्य जन्माला येण्यामागे y क्रोमोझोम महत्वाची भूमिका बाजावतो... तर दुस-या शक्यतेमध्ये आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून स्त्री- पुरुषांविना मुलाचा जन्म शक्य असल्याचं आरती यांनी स्पष्ट केलं आहे... खरंतर काही वर्षांपर्यंत टेस्ट ट्यूब बेबीची कल्पनाही कोणी केली नव्हती...पण आता त्यात काही नवल राहिलं नाही...लोकांसाठी ती एक सामान्य बाब बनली आहे...स्पर्म डोनर आणि एग डोनरच्या मदतीने स्त्री-पुरुषाच्या संबंधाविना आपत्य मुल जन्माला येतं...त्यामुळेच आज जगभर टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पहायला मिळतात... पण आगामी काळात शास्त्रज्ञ स्पर्म डोनर आणि एग डोनरची गरजही संपूष्टात आणण्याच्या मार्गावर आहेत..
पण आरती यांनी मांडलेली ही थेअरी समोर येताच ब्रिटनपासून जगभरातील देशांमध्ये धर्मापासून ते नैतिकतेपर्यंत एकच चर्चा सुरु झाली.. स्त्री- पुरुषाविना आपत्य जन्माला घालण्याच्या तंत्रज्ञानाला मंजूरी दिल्यास मानवता आणि आजचा समाज मोडकळीस तर येणार नाही ना अशी भिती या थेअरीचा विरोध करणा-यांनी व्यक्त केली आहे...
माता-पित्याशिवाय बाळाचा जन्म आज अशक्य वाटतं असला तरी विज्ञानाने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे...कृत्रिम पद्धतीने बाळाला जन्म घातला जाऊ शकतो का ते आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत... पती-पत्नीसाठी आपत्य निसर्गाची देणं आहे....स्त्री-पुरुषांच्या संबंधातून आपत्य जन्माला येतं हा निसर्गाचा नियम आहे...पण आता याच नियमाला छेद दिला जाण्याचा शक्यता नाकारता येत नाही.. स्त्री-पुरुषाविना आपत्य जन्माला घालणं शक्य असल्याचा दावा इंपेरियल कॉलेज ऑफ लंडनमध्ये जेनेटिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या आरती प्रसाद यांनी केलाय....मानसाच्या प्रजोत्पादनासाठी स्त्री-पुरुषाची गरज संपूष्टात येणार असल्याचं आरती यांचं म्हणनं आहे..
जेनेटिस्ट आरती प्रसाद यांनी आपल्या सिद्धांताच्या समर्थनार्थ काही