www.24taas.com, मुंबई
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यानी आज शिवसेनेच्या बदललेल्या धोरणावर थेट तोफ डागली आणि याला निमित्त ठरलंय ते शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत. संजय राऊत यांचं नाव घेऊन जरी ही टीका असली तरी तरी या टिकेचा सारा रोख होता तो शिवसेना आणि अर्थातचं शिवसेनाप्रमुख यांच्यावरच.. झी २४ तासला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गडकरींच्या मनातल्या भावना उघड झाल्या आणि केवळ युतीतच नव्हे तर सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरींनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला आणि शिवसेना-भाजप युतीतला विसंवाद किती टोकाला गेलाय हे समोर आलं. युतीतली धुसफूस तशी आजवर अनेकदा समोर आली. त्यावर वादविवादही झडले. पण शिवसेनाप्रमुखांनी अलिकडेच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भाजप नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यावर खुलासा करताना नितीन गडकरींनी थेट ‘मातोश्री’वरच तोफ डागली. सामनातून सातत्यानं होणाऱ्या टीकेवरून गडकरींनी संजय राऊतांवर रोष व्यक्त केला आणि असंच चालू राहिलं तर युतीचं भवितव्य कठीण असल्याचा खरमरीत इशाराही दिला. भाजप नेत्यांचा शिवसेनेशी बेबनाव आणि दुसरीकडे मनसेशी जवळीक यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस वाढली आहे. यावेळी गडकरींनीही शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वावर रोष व्यक्त करून थेट इशाराही दिलाय. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांतले संबंध आणखी ताणणार की विसंवाद कमी करण्यासाठी प्रयत्न होणार यावर युतीचं भवितव्य अवलंबून असेल.
मुळात शांत असलेली धुसफुस पुन्हा का उफाळून आली? या प्रश्नाचे उत्तर, भाजपचा पालिकेचा जागावाटपाचा आग्रह शिवसेनेला त्यावेळी आवडला नव्हता.. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भाजपच्या नेत्यानी केलेली जाहीर नाराजीही शिवसेनाप्रमुखाना आवडली नव्हती. झी २४ तास ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी युतीबद्दल आपले सडेतोड विचार मांडले आणि या वादाला नव्यानं तोंड फुटलं.
पुढे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.. महाराष्ट्राच्या राजकारणातलं वास्तवाला धरुन बेधडक विधानं करणारे आणि आपल्या वाक्यावर ठाम राहणारं नेतृत्व म्हणजे . भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रात राजकीय समीकरणं जुळवताना शिवसेनेचा सल्ला घ्यावाच लागतो तो केवळ युतीचा घटकपक्ष म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा दरारा असल्यामुळेच.. सत्तेची गणित जुळवण्यासाठी मित्रपक्ष त्याचे परीणाम काय होतील याची परीणाम कधीच शिवसेनाप्रमुख करत नाही. अगदी भीमशक्तीची घोषणा झाल्यानंतरही आठवलेना दादरच्या नामातंराचा हट्ट करु नका असं बाळासाहेब थेट सांगतात.. त्याच शिवसेनाप्रमुखांच्या युतीबदलच्या विधानावरुन आता पडसाद उमटू लागलेयत.. काही दिवसापुर्वीच झी २४तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनाप्रमुखानी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टोला हाणला होता.
शिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय. आणि म्हणूनच शिवसेनाप्रमुखानी य़ुतीचं भान राखण्याचा इशारा दिलाय.शिवसेनाप्रमुख हे नेहमीच आपल्या विधानावर ठाम असतात.. आता यावेळी गडकरीच्या उत्तरावर बाळासाहेब काय उत्तर देतात यावरचं आता युतीची पुढची दिशा अवलंबून असेल..
पुढे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला तगडा पर्याय म्हणून या दोन पक्षानी हिंदूत्व या मुद्यावर एकत्र युती केली आणि राजकारणात स्वताचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असूनही महाराष्ट्रात मात्र शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला मोठ्या भावाचीच वागणूक देत आला आहे. प्रमोद महाजनांची यशस्वी मध्यस्थी आणि शिवस