पासवर्ड श्रीमंतीचा

शेअर म्हणजे कंपनीतील आपली भागीदारी..नव्याने सुरू झालेली कंपनी, जनतेला भागीदार करून व्यवसायाला लागणा-या भांडवलाची उभारणी करत असते. त्यासाठी कंपनी बाजारात प्रथमच आणि स्वत:हून शेअर्सची विक्री करत असते.

Updated: May 12, 2012, 11:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शेअर बाजारात गुंतवणूक करायला अनेक जण उत्सुक असतात. मात्र, त्याविषयी पुरेशी माहिती प्रत्येकाकडेच असेलच असे नाही. अपु-या किंवा चुकीच्या माहितीच्या अभावी शेअर बाजारात पैसे गुंतवले तर त्याचा सामान्य गुंतवणुकदाराला थेट फटका बसू शकतो. शेअर म्हणजे कंपनीतील आपली भागीदारी..नव्याने सुरू झालेली कंपनी, जनतेला भागीदार करून व्यवसायाला लागणा-या भांडवलाची उभारणी करत असते. त्यासाठी कंपनी बाजारात प्रथमच आणि स्वत:हून शेअर्सची विक्री करत असते. या अगदी सुरूवातीच्या शेअर्सना IPO किंवा इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार थेट कंपनीकडूनच शेअर्स खरेदी करत असतात. आणि हे पैसे भांडवलउभारणीसाठी थेट कंपनीकडे जमा होतात. विक्री आणि खरेदीच्या या व्यवहारांना प्रायमरी मार्केट किंवा प्राथमिक बाजार म्हणतात. मात्र, एखाद्या कंपनीचा शेअरधारक आपले शेअर विकतो किंवा दुस-याचे शेअर खरेदी करतो, त्यावेळी या दोन शेअरधारकांमधल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना सेकेंडरी मार्केट किंवा दुय्यम बाजार म्हणतात. दुय्यम बाजारात, दोन व्यक्तींध्ये व्यवहार होत असल्यामुळे या व्यवहारातील पैसे कंपनीच्या ऑडीटमध्ये जमा होत नाहीत. त्यामुळे कंपनीच्या रोजच्या कामकाजावर त्याचा थेट परिणाम होत नाही.

 

अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि जागतिक स्टॉक्स घसरल्यामुळे या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. आठवड्यातल्या पाचपैकी चार दिवस बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी या आठवड्यात धोक्याच्या 5 हजार पातळीखाली घसरला. मागच्या आठवड्य़ातलं घटीचं चक्र भेदताना सोमवारी सेन्सेक्समध्ये 81 अंशांची वाढ दिसून आली होती. जनरल अँटी अव्हॉयडन्स रूल्सची अंमलबजावणी एक वर्षांपर्यंत पुढे ढकलल्याचं अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी संसदेत सांगितल्यानंतर बाजार सोमवारी मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा सुधारला होता. व्याजदर आणखी कमी करण्यास फारसा वाव नसल्याचं रिझर्व्ह बॅकेचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांनी सांगितल्यानंतर मंगळवारी बाजार कोसळला. बाजारानं मंगळवारी नीचांक नोंदवला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सलग दुस-या दिवशी बाजार 67 अंशांनी घसरला होता. परदेशी फंडांच्या विक्रीचा प्रभाव बुधवारी जाणवला. गुरुवारीही बाजारातली मंदी कायम होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची मोठ्या प्रमाणावर विक्री आणि अशक्त युरोपियन बाजारामुळे, भारतीय बाजारात गुरूवारी घसरण कायम राहिली. शुक्रवारी बाजारानं गेल्या 16 आठवड्यातल्या नीचांकाची नोंद केली. मार्च 2012 मध्ये औद्योगिक उत्पादन घटल्याची माहिती समोर आल्यानंतर शुक्रवारी बाजार 16 हजार 300 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्सवर प्रभाव टाकणा-या 30 मोठ्या कंपन्यांपैकी 27 कंपन्यांचे स्टॉक्स या आठवड्यात घसरले होते तर फक्त 3 कंपन्यांचे स्टॉक्स वधारले होते.

बॅंकींग सेक्टरवर पहिल्यांदा नजर टाकूया..व्याजदराबाबत संवेदनशील असणारे बॅकिंग स्टॉक्स या आठवड्यात घसरले होते. आपत्कालीन परिस्थितीत कर्ज देण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, म्हणून बॅंकांनी , हळूहळू मार्च 2018 पर्यंत कॅपिटल बफर्स वाढवण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेनं दिल्यामुळे, या आठवड्यात बॅंकांचे शेअर्स मंदीत होते. भारतात शाखांचं सर्वाधिक जाळ असणारी SBI, सर्वात मोठी खासगी बॅक ICICI आणि HDFC बॅकेचे शेअर्स या आठवड्यात  घसरले होते. आता वळूया ऑटो स्टॉक्सकडे..या आठवड्यात वाहनांच्या मर्यादित विक्रीमुळे व्याजदराबाबत संवेदनशील असणा-या ऑटो स्टॉक्समध्ये मंदी पहायला मिळाली. भारताची सर्वाधिक कमर्शिअल वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स, सर्वाधिक कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी, सर्वाधिक ट्रॅक्टर्स आणि स्पोर्टस वाहन निर्माती महिंद्रा एण्ड महिंद्रा, सर्वाधिक मोटर सायकल उत्पादक हिरो मोटोकॉर्पचे स्टॉक्स या आठवड्यात घसरले होते. मात्र, बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये किंचीत वाढ पहायला मिळाली. मेटल स्टॉक्समध्येही या आठवड्यात मंदी पहायला मिळाली. हिंडाल्को, स्टर्लाईंट इंडिया, जिंदाल आणि टाटा स्टील

Tags: