झी २४ तास वेब टीम, मुंबई
देशात मोबाईल फोन वापरणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांची आजपासून एका कटकटीतून सुटका होणार आहे... देशातल्य़ा प्रत्य़ेक मोबाईलधाराकांची डोकेदुखी बनलेले अनावश्यक कॉल आणि मार्केटिंग मेसेजवर आता गदा येणार आहे...कारण ट्रायने यासंदर्भात आजपासून नवे नियम लागू केले आहेत....त्यामुळं तुमच्या मोबाईल फोनची बिनकामाची रिंग आता वाजणार नाही...
तुम्ही नको असलेल्या फोन कॉल्समुळं त्रस्त असाल तर आता तुमच्यासाठी एक खुषखबर आहे... तुम्हाला नको असलेले फोन कॉल्स यापुढे तुमच्या मोबाईल फोनवर येणार नाहीत...कारण आजपासून ट्रायने या संदर्भात काही नियम लागू केले आहेत..तुम्हाला नको असलेल्या कॉल्सपासून सुटका हवी असेल तर डू नॉट डिस्टर्ब कॉलमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागेल...ही सुविधा तुम्हाला तुमच्या मोबाईल सर्व्हिस देणा-या कंपनीकडून उपलब्ध केली करण्यात येईल...
ग्राहकाने काय करायला हवं ?
नको असलेल्या फोन कॉल्सपासून सुटका करुन घेण्यासाठी मोबाईल फोन धारकाला 1909 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल..जर तुम्हाला पूर्णपणे नको असलेला कॉल्सपासून मुक्ती हवी असल्यास तुमच्या मोबाईल फोनमध्ये
START 0 असा मेसेज लिहून तो 1909 वर SMS करा....हा मेसेज पाठविल्यानंतर सतत सतावणाऱ्या नको असलेल्या कॉल्सपासून तुमची सुटका होईल....पण तुम्हाला काही विषयासंदर्भात नको असलेल्या कॉल्सची आवश्यकता असल्यास त्यासंबंधीही ट्रायने एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे..जर तुम्हाला बँकिंग, रियल इस्टेट किंवा आरोग्याशी संबंधीत माहिती हवी असल्यास तुम्ही तुमच्या पसंतीनुसार पर्याय निवडू शकता...यापूर्वी ज्यांनी या सुविधेसाठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केलं आहे त्यांना पुन्हा नंबर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही..
मोबाईल सेवा पुरविणाऱ्या ऑपरेटर्सकडून डू नॉट डिस्टर्ब संबंधीची सगळी माहिती वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे..तसेच नको असलेल्या कॉल्सपासून ग्राहकांची सुटका करण्यासाठी सगळी तयारी करण्यात आल्याचं ऑपरेटर्सकडून सांगण्यात आलय..
ट्रायकडं उपलब्ध असलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत जवळपास 13 कोटी मोबाईलधारकांनी नको असलेल्या कॉल्सपासून सुटका करुन घेण्यासाठी आपल्या नंबरची नोंदणी केली आहे..जर तुम्हीही नको असलेल्या फोन कॉल्सला वैतागला असाल तर आताच आपला मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्बसाठी रजिस्टर करा. गेल्या अनेक वर्षांपासून अशी मागणी केली जात होती. टेलिमार्केटिंग कंपनीच्या वेळी-अवेळी येणाऱ्या कॉल्समुळं मोबाईलधारक पुरते वैतागले होते...त्यामुळं अशा मार्केटिंग कॉलला लगाम लावण्याची मागणीने गेल्या काही वर्षात जोर धरला होता...ग्राहकांच्या मागणीची दखल घेत अखेर ट्रायने आजपासून हे नवे नियम लागू केले आहेत...या सुविधेमुळं कोट्यवधी मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे..
तुम्ही कामात असताना खणाणणारा फोन, आणि फोन उचलल्यावर मार्केंटिग कंपन्याची बकबक.. हा सारा प्रकार आपल्याला नाहक सहन करावा लागतो. मात्र आजपासून ट्रायचे नवे नियम लागू होत आहेत. कुठलीही सेवा देणाऱ्या कॉल्सची सुरुवात 140 या नंबरापासून सुरुवात होणार आहे.. डू नॉट कॉलच्या रजिस्टरमध्ये त्या कॉलची नोंद केल्यावरही त्यांचा कॉल आल्यास अशा नंबरना आता दंड ठोठावला जाणार आहे.
नको असलेले फोन कॉल्स आणि एसएमएसमुळं आता तुमच्या मोबाईल फोनची रिंग वेळ-अवेळी वाजणार नाही. कारण ट्रायने या संदर्भातील नवे नियम लागू केले आहेत. ट्रायच्या या नव्या नियमामुळं नको असलेल्या कॉल्सपासून मोबाईल फोनधारकांची सुटका होणार आहे..
ट्रायच्या नव्या नियमानुसार आता टेलिमार्केटिंग कंपनीचा फोननंबर ओळखणं सोपं होणार आहे..टेलिमार्केटिंग कंपन्यांचा नंबर 140 या अंकाने सुरु होणारा असणार आहे..त्यामुळं मोबाईलधारकाला टेलिमार्केटिंग कंपनीचा फोन क्रमांक सहज ओळखता येईल...टेलिमार्केटिंग कंपनीचा फोन क्रमांक ओळखता आल्यामुळं मोबाईलधारकाला तो फोन कॉल टाळणं सोपं होणार आहे....रात्री 9 ते सकाळी 9 या वेळेदरम्यान टेलिमार्केटिंग कंपनी ग्राहकांना फोन कॉल किंवा एसएमएस करु शकणार नाही..जर एखाद्या टेलिमार्केटिंग कंपनीने ग्राहकांला या वेळेत फोन कॉल किंवा एसएमएस केल्यास त्या टेलिमार्केटिंग कंपनीला दंड ठोठा