अंगारकी चतुर्थीचा उत्साह...

आज अंगारकी चतुर्थी... याचनिमित्तानं मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2012, 08:15 AM IST

www.24taas.com, मुंबई
आज अंगारकी चतुर्थी... याचनिमित्तानं मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलीय.
मंदिरात भव्य सजावट करण्यात आलीय. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धीविनायकाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच मोठ्या संख्येनं गर्दी केलीय. सोमवार सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस असूनही गणेशभक्तांच्या उत्साहात आणि भक्तीमध्ये काही कमी आली नसल्याचं पाहायला मिळालं. जवळपास दीड वर्षानंतर अंगारकी आणि मंगळवारचा योग जुळून आलाय. त्यामुळं बाप्पाकडं मनोकामना मागण्यासाठी भक्तांनी सिद्धीविनायक मंदिरात गर्दी केलीय.