अखेर भाजपच्या जाहीरनाम्यात `राम`

भाजपने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला, भाजपचा जाहीरनामा हा राम मंदिराच्या मुद्यावर अडला असल्याचं सांगण्यात येत होतं, अखेर हा मुद्दा जाहीरनाम्यात सामावण्यात आला.

Updated: Apr 7, 2014, 02:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला, भाजपचा जाहीरनामा हा राम मंदिराच्या मुद्यावर अडला असल्याचं सांगण्यात येत होतं, अखेर हा मुद्दा जाहीरनाम्यात सामावण्यात आला आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पहिल्या दिवशी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
भाजपचे पंतप्रधानपदाच्या उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, नवी दिल्लीत आज पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.
भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा समावेश करण्यात आला असला, तरी कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिरासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राम मंदिराचा मुद्दा यावेळी भाजपने अधिक आक्रमकपणे मांडलेला नाही, मात्र सरकार आलं, तर भाजप हा मुद्दा किती आक्रमकपणे पुढे नेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात घेण्यावरून जाहीरनामा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद होते, त्यामुळेच या जाहीरनामा प्रसिद्ध होण्याला विलंब झाला होता.
बऱ्याच प्रतीक्षेनंतर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशीच आज भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला. सबकासाथ सबका विकास असा नारा देत एक भारत श्रेष्ठ भारत निर्माण करण्याचं आश्वासन यात देण्यात आलयं.
घटनेच्या चौकटीत राहून अयोध्येत राम मंदिराची उभारणी, समान नागरी कायद्यासाठी आग्रह आणि जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेचं 370 कलम रद्द करण्यासाठी प्रयत्न अशी आश्वासनं या जाहिरनाम्यात देण्यात आली आहेत.
भाजप नेते मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली हा जाहीरनामा तयार करण्यात आलाय. यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज उपस्थित होते.
महागाई आणि भ्रष्टाचार दूर करणे, काळ्या पैशाला आळा घालणे, परदेशात दडवलेला काळा पैसा परत आणणे, मागास 100 जिल्हांचा विकास, महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण, शिक्षणव्यवस्थेत सुधारणा भाजप भर देणार असल्याचं जाहीरनाम्यात म्हटलंय.
देशाचा विकास हेच आमचे लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दिलीय.
भाजपच्या जाहिरनाम्यातील काही मुख्य मु्द्दे
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फंड
काळा बाजार करणा-यांना शिक्षा देण्यासाठी विशेष कोर्ट
अन्नधान्य वितरण, साठा अधिक प्रभावीपणे करणार
राष्ट्रीय कृषी बाजाराची उभारणी
मल्टिब्रँड रिटेलमध्ये FDIला परवानगी नाही
भ्रष्टाचार मुक्त प्रशासन उभारण्यासाठी प्रयत्न
तंत्रज्ञानावर आधारित ई गव्हर्नन्स
कर रचनेचे सुलभीकरण
सर्व स्तरावर कामकाजात पारदर्शकता आणणार
भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणार
परदेशातील काळा पैसा भारतात आणणार
परदेशातील काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स
नोकरशाहीला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन
रोजगार निर्माण करणा-या क्षेत्रांना प्राधान्य
वस्त्रोद्योग,पादत्राणं, इलेक्ट्रॉनिक, पर्यटनावर भर
कृषी मालाच्या विक्रीतून रोजगारनिर्मिती
तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य
माहिती तंत्रज्ञान - देशभर ब्रॉडबॅन्डचे जाळे
सर्व गावात नॅशनल ऑप्टिकल फायबरचं
राष्ट्रीय ई ग्राम-विश्व ग्राम ही योजना देशभर राबवणार
ही योजना देशभर राबवणार
हायस्पीड डिजिटल हायवेची देशभर उभारणी
देशातील नद्या जोडण्याचा प्रयत्न करणार
आयटीचा वापर भारतीय भाषांत होण्यासाठी ई-भाषा मिशन
गरिबी हटवण्यासाठी -100 मागास जिल्ह्यांचा विकास
अन्न वितरणाच्या व्यवस्थेत सुधारणा
गरिबी आणि कुपोषण हटवण्यासाठी खास मोहिम
हटवण्यासाठी खास मोहिम
शहरी-ग्रामीणमधील दरी कमी करणार
देशातील प्रत्येक व्यक्तीचं पक्कं घर असावं
संकटकाळासाठी अन्नधान्य साठवण
अल्पसंख्याकांना विशेष संधी देणार
उर्दुच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार
मदरश्यांच्या आधुनिकीकरणावर भर देणार
वक्फ बोर्डांना अधिक सक्षम करणार
उद्योजकतेला प्रोत्साहन देणार
पारंपरिक कौशल्यांना अधिक संधी मिळवून देणार
घटनेच्या चौकटीत राहून अयोध्येत राम मंदिर उभारणार
देशात समान नागरी कायदा आणणार
जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणा-या कलम 370 हटवणार
कलम 370 बाबत सर्व संबंधितांशी चर्च