नरेंद्र मोदी `कुत्र्याच्या पिल्लाचा मोठा भाऊ`...

भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आता सगळ्याच पक्षांच्या निशाण्यावर आलेत. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशमधील शहर विकास मंत्री आझम खान यांनीही यात हात धुवून घेतलेत. मोदींवर टीका करताना त्यांना आपली सीमारेषाही ओलांडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 2, 2014, 03:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रामपूर (उत्तर प्रदेश)
भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आता सगळ्याच पक्षांच्या निशाण्यावर आलेत. समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशमधील शहर विकास मंत्री आझम खान यांनीही यात हात धुवून घेतलेत. मोदींवर टीका करताना त्यांना आपली सीमारेषाही ओलांडलीय.
आझम खान यांनी रामपूरमधल्या एका निवडणूक प्रचारसभेदरम्यान मोदींची तुलना कुत्र्याच्या पिल्लाबरोबर करून टाकलीय. त्यांनी मोदींना `कुत्र्याच्या पिल्लाचा मोठा भाऊ` असं संबोधलंय. इतकंच नाही तर आझम यांनी मोदींवर `गोबर` आणि `पेशाब`सारखे शब्दही उधळले.
नरेंद्र मोदी यांना एकेरी नावानं संबोधत आझम खान यांनी `नरेंद्र मोदी लाल हिंदुस्थाचा बादशाह होण्याची स्वप्न पाहतो आणि स्वप्नातही त्याला आझमच्या म्हशींच्या गोबर आणि पेशाबचाच विचार येतो. जेव्हा माझ्या म्हशी मोदीच्या अडचणी बनल्यात तर विचार करा माझं नाव त्याला किती सतावत असेल` असं म्हणताना उत्तर प्रदेशात मुस्लिम मतं विभागण्याचा प्रश्नच येत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आझम खान रामपूरमधले पक्षाचे उमेदवार नसीर खान यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते.
तसं पाहिलं तर आझम खान आणि वाद-विवाद यांचं नातं फार जुनं आहे. याअगोदरही त्यांची काही वाक्यं खूपच चर्चेत आली होती. त्यामुळे आता भाजप याला कसं उत्तर देणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.