www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील रास्ता पेठेत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
कारण काँग्रेसच्या उमेदवारासाठी पैसे वाटण्याचं काम भारती विद्यापिठाचे काही कर्मचारी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तापेठेत धाव घेतली, पैसे वाटणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेच्य़ा कार्यकर्त्यांनी केली आहे.
मनसेच्या उमेदवारांनी रास्ता पेठेत पोलिस स्टेशनमध्ये गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
काँग्रेसकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.