'मुंडें'च्या पुतण्याची ठाकरेंच्या 'पुतण्या'ला भेट

राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे आज कृष्णकुंजवर दाखल झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला नक्कीच महत्त्व आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2014, 03:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीचे नेते आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे आज कृष्णकुंजवर दाखल झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला नक्कीच महत्त्व आहे. त्यामुळे, साहजिकच अनेकांच्या नजरा राज ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीकडे लागलेत.
मात्र, माझी आणि राज ठाकरेंची २० वर्षांपासून मैत्री असून ही पूर्वनियोजित भेट असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय.
गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या विधान परिषदेच्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर काकांच्या नाकावर टिच्चून त्यांनी पुन्हा झालेल्या निवडणुकीत बाजी मारली होती... आता, राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे कुणाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्याचं शल्य मनात बाळगून धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात दीड वर्षापूर्वी बंडाचं निशाण फडकावलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.