एकनाथ खडसेंच्या सूनबाई लोकसभा लढवणार

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदार संघातून भाजपकडून, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या निवडणूक लढवणार आहेत.

Updated: Mar 24, 2014, 06:06 PM IST

जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदार संघातून भाजपकडून, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या निवडणूक लढवणार आहेत.
रक्षा खडसे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे मनीष जैन असणार आहेत. यामुळे ही लढत अधिक रंगतदार होणार आहे.
यापूर्वी या मतदार संघातून भाजपचे हरिभाऊ जावळे निवडून आले होते.
हरिभाऊ जावळे यांच्या जागेवर शेवटच्या क्षणी रक्षा खडसे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
रक्षा खडसे जिल्हा परिषद सदस्य आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे उल्हास पाटील हे देखिल अपक्ष उमेदवारी करणार आहेत.
उल्हास पाटील यांच्यामुळे लेवापाटीदार समाजाच्या मतांची विभागणी होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.