www.24taas.com, झी मीडिया, पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झालीय. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. मासाळवाडी ग्रामस्थांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
निवडणूक कायद्याच्या कलम 171 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे अहवाल दिला आहे. खोपडे यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत अहवाल मागितला होता. त्यानुसार तो देण्यात आला आहे.
अजित पवार यांना पाणीप्रश्नाबाबत विचारण्यात आले असता त्यांनी धमकावल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अजित पवार अचणीत आले आहेत. दरम्यान, हा माझा आवाज नाही, तो दुसऱ्यानेच काढला आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर अजित पवारांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.