निवडणूक लढविणाऱ्या सिताऱ्यांच्या सिनेमांवर बंदी

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तारे-तारका उतरलेत. मात्र, त्यांना त्याचा फटका बसलाय. निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे सिनेमे दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2014, 04:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तारे-तारका उतरलेत. मात्र, त्यांना त्याचा फटका बसलाय. निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे सिनेमे दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली आहे.
निवडणूक होईपर्यंत दूरर्दशनवर हेमा मालिनी, जयाप्रदा, राज बब्बर, विनोद खन्ना आणि परेश रावल यांचे चित्रपट दाखवण्यात येत नाही. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. काही ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत. तर काही ठिकाणी व्हायच्या आहेत. त्यामुळे सिनेमांवर बंदी आहे.
भाजपच्या तिकिटावर अमेठीतून स्मृति ईरानी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे तिचाही कार्यक्रम दाखविण्यात येत नाही. जर अभिनेता आणि अभिनेत्रिंचा कार्यक्रम दाखविला तर तो आचारसंहितेचा भंग होईल, असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणण आहे. त्याचे कार्यक्रम आणि चित्रपट पाहून मतदार प्रभावित होतील, तसे ते होऊ शकते.
राज बब्बर (काँग्रेस), नगमा (काँग्रेस), गुल पनाग (आम आदमी पार्टी) आणि जया प्रदा (अपना लोकदल) यांच्या मतदार संघात निवडणूक झाली आहे. तरीही त्यांच्या सिनेमांबर बंदी आहे. हेमा मालिनी (भाजप), जावेद जाफरी (आम आदमी पार्टी) आणि स्मृति ईरानी (भाजप) यांच्या जागांवरील मतदान व्हायचे आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमावर बंदी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.