गावित पिता-पुत्री भाजपमध्ये प्रवेश करणार?

वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 18, 2014, 12:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समजतंय.
मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गावित यांच्या कन्या हिना गावित यांना भाजपच्यावतीनं उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड संतापलेत. हिना गावित यांना भाजपनं उमेदवारी दिल्यास विजयकुमार गावित यांची त्याच क्षणी मंत्रिमंडळातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येईल, असा कडक इशारा अजित पवारांनी दिलाय.
मात्र, अजित पवारांच्या धमकीला न जुमानता, गावित हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, मी अजूनही राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असून पक्ष सोडलेला नाही. शरद पवारांशी आपण लवकरच चर्चा करणार आहोत, असं गावित यांनी स्पष्ट केलंय.
हीना गावित आज दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. आज संध्याकाळी गावितांचा हा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.