www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात देश- विदेशातील मान्यवरांना सन्मानाचं स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा मात्र अवमान करण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू होती.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना तिसर्याा-चौथ्या रांगेत बसवण्यात आलं, तर अभिनेता सलमान खान, अनुपम खेर यांना मात्र दुसर्या रांगेत जागा देण्यात आल्यामुळं राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. या मोठ्या नेत्यांचा योग्य तो मान न राखल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीकास्त्र सोडलंय.
‘शरद पवार, चिदंबरम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना जर तिसर्याय आणि चौथ्या रांगेत बसवलं जात असेल आणि त्यांच्यापुढच्या रांगेत जर सिने अभिनेत्यांना जागा मिळत असेल तर यावरून नव्या सरकारच्या कार्यपद्धतीचा अंदाज काढता येईल. राजशिष्टाचारापेक्षा नव्या सरकारच्या आवडी-निवडीवर ही बैठक व्यवस्था करण्यात आली होती आणि हे सगळं राज्यातली जनता पाहते आहे’, अशा सूचक शब्दांत नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.
शरद पवार आणि मनोहर जोशींशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनाही तिसर्याड रांगेत जागा देण्यात आली होती. त्यांच्या पुढच्या रांगेत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा बसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.