राजनाथ सिंह यांची राजकीय कारकीर्द एका महाविद्यालयातील लेक्चरर पासून सुरू झाली असली, तरी त्यांनी राजकारणात उतरून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली.
राजनाथ सिंह हे 31 डिसेंबर 2005 रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर 19 डिसेंबर 2009 पर्यंत कायम राहिले.
नितिन गडकरी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, राजनाथ सिंह हे पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आल्यानंतर, त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाठिंबा देण्यासाठी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची यशस्वीपणे मनं वळवली, यासाठी त्यांनी पक्षात महत्वाची भूमिका बजावली.
राजनाथ सिंह यांचा जन्म 10 जुलै 1951 साली झाला, राजनाथ सिंह यांनी गोरखपूर विद्यापिठातून एमएस्सी भौतिकशास्त्राची डिग्री मिळवली आहे.
केंद्रीत एनडीएचं सरकार आलं तेव्हा राजनाथ सिंह यांनी कृषीमंत्रीपदही भूषवलं. आता 2104 मध्ये ते गाझियाबादमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत, 2009मध्ये त्यांनी लखनौमधून निवडणूक लढवली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.