LIVE -निकाल अमरावती

प्रोफाईल मतदारसंघाचं : अमरावती

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती

दुपारी 4 वाजताअपडेट अमरावती - आनंदराव अडसुळ 1लाख 36 हजार 807 मतांनी विजयी
सकाळी 8:50 वाजता अपडेट
Ø अमरावती आनंदराव अडसुळ आघाडीवर
मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. याच ठिकाणी पाहा क्षणाक्षणाचे लाइव्ह अपडेट आणि सविस्तर निकाल... F5 बटन दाबून किंवा पेज रिफ्रेश करून अपडेट पाहा

मतदारसंघ : अमरावती
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस/राष्ट्रवादी – नवनीत रवी राणा (राष्ट्रवादी)
महायुती – आनंदराव अडसूळ (शिवसेना)
आप – भावना भावेश वासनिक
बसपा - गुणवंत देवपारे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
आनंद अडसूळ – शिवसेना – ३१,४२,२८६ मतं – ४२.९१ %
राजेंद्र गवई - आर.पी.आय – २,५२,५७० मतं – ३४.४८%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,२३,८५५
पुरुष : ७,४६,४६४
महिला : ६,७७,३९१
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 अडसूळ यांच्या विरोधात शिवसेनेत अंतर्गत नाराजी किंवा गटबाजी असली तरी अडसूळ हे पुन्हा नशीब अजमविणार हे नक्की.
 डॉ. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यावर अमरावतीचे भाग्य फळफळले होते. विकासाची काही कामे मार्गी लागली.
 अडसूळ यांच्या विरोधात लढण्यासाठी बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्या अभिनेत्री पत्नीचे नाव पुढे केले आहे.
 अमरावतीमध्ये वास्तविक काँग्रेसचे प्राबल्य पण गेल्या वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला.
 यंदा हा मतदारसंघ मिळावा अशी काँग्रेसची मागणी होती. त्यावेळी मतदारसंघ कोणाच्याही वाटय़ाला जावो पत्नीला काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून लढविणार यावर राणा महाशय ठामपणे दावा करत होते.
 राणा यांची सारीच पार्श्वभूमी आणि मतदारसंघात कायमच वादग्रस्त ठरणारे अशी प्रतिमा लक्षात घेता गेल्या वेळी ‘उपरे’ म्हणून हिणविण्यात आलेल्या अडसूळ यांचे नशीब पुन्हा फळफळेल अशीच आता तरी चिन्हे आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.