LIVE -निकाल पालघर

प्रोफाईल मतदारसंघाचं : पालघर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 06:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पालघर
पालघऱ - भाजपचे चिंतामण वानगा विजयी
9.27पालघऱ - भाजपचे चिंतामण वानगा आघाडीवर
मतदारसंघ : पालघर (एसटी)
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : 58 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – रविंद्र गावित (काँग्रेस)
महायुती – चिंतामण वानगा
समाजवादी पार्टी – प्रकाश सावर
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
बळीराम जाधव- बहुजन विकास आघाडी – 2,23,234 - 0.47%
दामोदर शिंगडा – काँग्रेस – 1,60,570 - 21.92%
चिंतामण वनगा – भाजप - 2,10,868 - 28.78%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,23,061
पुरुष : 7,84,317
महिला : 7,38,744
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची अवस्था फारच कमकुवत आहे. पालघरचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात काँग्रेसचा एकही आमदार नाही.
 त्यातूनच जिल्हा विभाजन करून पालघर जिल्याची निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पालघर स्वतंत्र जिल्हा झाल्यास काँग्रेसला बरे दिवस येतील हे त्यामागचे गणित आहे.
 पण राष्ट्रवादीने खोडा घातल्याने पालघर जिल्हा निर्मितीस मुहूर्तच मिळत नाही.
 भाजपमध्ये माजी खासदार आणि विद्यमान आमदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी विष्णू सावरा यांचे नाव चर्चेत आहे.
 निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यास काँग्रेसला ते फायदेशीर ठरू शकते.
 सध्या तरी काँग्रेसचे नेते कोणता निर्णय घ्यायचा या संभ्रमात आहेत
 एकूणच वसईचे ठाकूर कोणता निर्णय घेतात यावरच या मतदारसंघातील राजकारण अवलंबून राहणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.