LIVE -निकाल उस्मानाबाद

प्रोफाईल मतदारसंघाचं : उस्मानाबाद

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 10:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद

दुपारी २.०० वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - रवी गायकवाड विजयी... राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील पराभूत
सकाळी ११.३० वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - १२ व्या फेरीअखेर सेनेचे रवी गायकवाड १,१२,००० मतांनी आघाडीवर

सकाळी ११.०० वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - माजी मंत्री राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील ६२ हजार मतांनी पिछाडीवर

सकाळी १०.३० वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - शिवसेनेचे रवी गायकवाड ६२,००० मतांनी आघाडीवर
सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - पाचव्या फेरीअखेरीस शिवसेनेचे रवि गायकवाड ४३,००० मतांनी आघाडीवर
सकाळी ८.३० वाजता अपडेट
Ø उस्मानाबाद - रवी गायकवाड ५६० मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : उस्मानाबाद
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – पद्मसिंह बाजीराव पाटील (राष्ट्रवादी)
महायुती – रवी गायकवाड (शिवसेना)
आप – विक्रम साळवे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
डॉ.पद्मसिंह पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस – 4,08,840 मतं - 44.22%
रविंद्र गायकवा – शिवसेना – 4,02,053 मतं - 43.49%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 16,08,852
पुरुष : 8,45,884
महिला : 7,62,968
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 उस्मानाबाद म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील हे समीकरण... शरद पवार यांचे एकेकाळी उजवे हात समजले जाणारे डॉ. पाटील नेहमीच वादग्रस्त ठरले.
 नागपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या अंगावर धावून जाण्यापासून विधानसभेत भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेला वाद, असे प्रकार डॉ. पाटील यांच्याबाबत घडत गेले.
 डॉ. पाटील हे राज्याच्या राजकारणात, तर त्यांचे चुलतबंधू पवनराजे स्थानिक राजकारण सांभाळणार अशी व्यवस्थाच झाली होती. उभयतांमध्ये बिनसले आणि ते पार पवनराजे यांच्या हत्येपर्यंत गेले. या हत्येत डॉ. पाटील यांना तुरुंगाची हवा खावी लागली.
 कारखाना, बँक सारेच गमावले. अगदी गेल्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून डॉ. पाटील यांचा मुलगा राणा यांचा पराभव पवनराजे यांचा मुलगा ओमराजे यांनी केला. खुनाच्या आरोपात अटक झाल्याने डॉ. पाटील यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला.
 पण लढवय्या स्वभावाचे डॉ. पाटील शांत बसले नाहीत. जामिनावर सुटल्यावर त्यांची चक्री सुरू झाली. गेल्या वेळी जेमतेम निवडून आलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासाठी ही लढाई जिंकू किंवा मरू अशी आहे. पराभव झाल्यास राजकीय कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती आहे.
 हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी भाजपचाही येथे डोळा आहे. तसेच काँग्रेसचेही आहे.
 या मतदारसंघात लिंगायत समाजाच्या मतांचे प्रमाण लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने बार्शीचे दिलीप सोपल यांना मंत्रिपद दिले. कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ कायम राखण्याचा राष्ट्रवादीचा आटापिटा आहे.

जातीपातीची समीकरणं
 उमरगा, औसा आणि बार्शी विधानसभा मतदार संघात लिंगायत समाजाचा प्रभाव अधिक आहे. तर उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात काही प्रमाणात मुस्लीम समाजाचा प्रभाव आहे.
 जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात दलित मतदारांची संख्याही निकालावर परिणामकारक ठरू शकेल अशीच आहे. बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलना मुळे शिवसेनेला या जिल्ह्यात पाळेमुळे रोवता आली आहेत.

मतदारसंघ : उस्मानाबाद
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – पद्मसिंह बाजीराव पाटील (राष्ट्रवादी)
महायुती – रवी गायकवाड (शिवसेना)
आप – विक्रम साळवे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
डॉ.पद्मसिंह पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस