www.24taas.com, झी मीडिया, परभणी
सायंकाळी ५.०० वाजता अपडेट
Ø परभणी शिवसेनेचे संजय जाधव १ लाख २७ हजार १५५ मतांनी विजयी
दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø परभणी - १० व्या फेरीअखेर शिवसेना ३६,७८२ मतांनी आघाडीवर
सकाळी ९.१५ वाजता अपडेट
Ø परभणी - संजय जाधव आघाडीवर
Ø मतमोजणीला सुरुवात... सर्वप्रथम पोस्टल मतमोजणी होणार
मतदारसंघ : परभणी
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६२ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विजय भांबळे (राष्ट्रवादी)
महायुती – संजय जाधव (शिवसेना)
आप – सलमा कुलकर्णी (
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
गणेशराव दुधगावकर - शिवसेना - 3,85,387 - 44.26%
सुरेश वरपुडकर - राष्ट्रवादी - 3,19,969 - 36.75%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 1610088
पुरुष : 827635
महिला : 782453
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
मराठवाडय़ातील परभणी मतदारसंघ हा तसा शिवसेनेचे बालेकिल्ला. १९९८ चा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून येतो. निवडून येणारे खासदार नंतर शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसवासी झाल्याची परंपराच पडली. यात अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि तुकाराम रेंगे-पाटील यांचा समावेश आहे. हात पोळलेल्या शिवसेनेने मग गेल्या वेळी उलटाच प्रयोग केला. काँग्रेसमधून गणेश दुधगावकर यांना गळाला लावण्यात आले आणि शिवसेनेचा भगवा हातात घेतलेले दुधगावकर हे लोकसभेत पोहचले.
माजी मंत्री असलेले दुधगावकर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले ते ‘शिवसैनिक’ शेवटपर्यंत झालेच नाहीत.
खासदार निष्क्रिय असल्याची चर्चा विरोधकांनी नव्हे तर शिवसेनेतूनच उठविण्यात आली.
यातूनच दुधगावकर यांचा पत्ता कापून लोकसभेच्या निवडणुकीत स्वार होण्यासाठी शिवसेनेमध्ये आतापासूनच स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पक्षाचे दोन विद्यमान आमदारही आहेत. हे सगळे इच्छुक शिंके कधी तुटते याचीच वाट पाहून आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.