www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
5 वाजता अपडेट
शिवसेनचे राजन विचार 2 लाख 80 944 मतांनी विजयी
- विद्यमान खासदार संजीव नाईक यांना धूळ चारली
- मनसेचा चमत्कार फ्लॉप, अभिजीत पानसे तिसऱ्या क्रमांकावर
1.15 वाजता अपडेट
15 फेरीत राजन विचारे 1 लाख 58 हजार मतांनी आघाडीवर
1.00 वाजता अपडेट
14 फेरीत राजन विचारे 1 लाख 54 हजार मतांनी आघाडीवर
12.30 वाजता अपडेट
ठाण्यातून राजन विचारे 1 लाख 14 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 11.27 वाजता अपडेट
राजन विचारे यांची सातव्या फेरीनंतर 75 हजारांची घेतली आघाडी
सकाळी 11.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे राजन विचारे 60 हजार मतांनी आघाडीवर
सकाळी 11.00 वाजता अपडेट
पाचव्या फेरीत शिवसेनेचे राजन विचारे यांची 48 हजार मतांची आघाडी
सकाळी 9.30 वाजता अपडेट
ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर, तिसऱ्या फेरीत 27,890 मतांनी आघाडी
सकाळी 9.24 वाजता अपडेट
ठाण्यातून शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर, राष्ट्रवादीचे संजीव नाईक पिछाडीवर
9.23 राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजीव नाईक पिछाडीवर
मतदारसंघ : ठाणे
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 42 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – संजीव नाईक (राष्ट्रवादी)
महायुती – राजन विचारे (शिवसेना)
आप – संजीव साने
मनसे – अभिजीत पानसे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
संजीव नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस – ३,०१,००० मतं – ४०.१४%
विजय चौगुले – शिवसेना -२,५१,९८० मतं – ३३.६०%
राजन राजे - पूर्वी मनसेत – १,३४,८४० मतं – १७.९८%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १८,०६,८०३
पुरुष : ९,९८,७९२
महिला : ८,०८,०११
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
ठाण्याचा गड सर्वासाठीच अवघड!
ठाणे शहरातील तीन मतदारसंघांच्या जोरावर हा गड कायम राखणे शिवसेनेला तेव्हाही कठीण नव्हते. मात्र, ठाण्यातील मतदारांना गृहीत धरत विजय चौगुले यांच्यासारखा गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला उमेदवार येथील ठाणेकरांच्या माथी मारण्याचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय आत्मघाती ठरला.
शिवसेनेत उमेदवारीवरून चर्वितचर्वण सुरू असताना संजीव नाईक मात्र जोरदार कामाला लागल्यानं त्यांना या निवडणुकीत संधी मिळाली.
मोदी लाट किंवा काँग्रेस विरोधातील वातावरण ही पाश्र्वभूमी असली तरी ठाण्याची लढाई आघाडी किंवा युती दोघांनाही सोपी नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.