www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपाला ऐतिहासिक एक हाती सत्ता मिळवून देणार नरेंद्र मोदी यांची, सर्वानुमते संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे, नरेंद्र मोदी यांचा 26 मे रोजी शपथविधी पार पडणार आहे.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांनी 40 मिनिटांचं भाषण केलं, यात त्यांनी 40 मुद्दे सर्वांसमोर मांडले, दरम्यान ते भावूकही झाले होते.
मोदींच्या 40 मिनिटांच्या भाषणातील 40 मुद्दे
1. हा विजय आमचा नाही, जनता आणि कार्यकर्त्यांचा आहे
2. आता खूप मेहनत करणार, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार
3. नरेंद्र मोदी दोन वेळेस भावूक झाले
4. आज अटलजी येथे राहिले असते, तर तो सोनेरी क्षण राहिला असता.
5. आडवाणीजी आपण कृपा शब्दाचा वापर करू नका (भावूक होऊन)
6. मातृ सेवा कधीही कृपा होऊ शकत नाही
7. मी पदभार नाही, कार्यभार सांभाळतोय
8. आता जबाबदारीचा काळ सुरू झाला आहे
9. 2019 मध्ये मी देशाला रिपोर्ट कार्ड देईन
10. एक अनुशासित शिपायाप्रमाणे मी अध्यक्षांना रिपोर्ट सोपवलाय.
11. एका गरीब परिवारातला व्यक्ती आज इथे उभा आहे.
12. सीएम झाल्यावर पहिल्यांदा मी विधानसभा पाहिली होती, तसंच आता होतंय.
13. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेता आला नाही, मात्र जनतेने जगण्याचा अधिकार दिला
14. सकारात्मक मार्गासाठी आशावादी असणं गरजेचं
15. मी स्वभावाने आशावादी आहे, म्हणून निराशा सोडून दिलीय
16. आशावादाचं देशात आशा जागवू शकतो
17. मागचे अनुभव कितीही वाईट असले तरी चालेल, निराशा सोडावी लागेल.
18. गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा वाटलं, राज्य उध्वस्त झालं, पण गुजरात आज प्रगतीच्या दिशेने धावतोय
19. देशाने निर्णय घेतला तर देशही कुठल्या कुठं जाऊ शकतो
20. भाजप सरकार गरिबांचं सरकार आहे.
21. हे सरकार देशातील गरीब, युवा आणि अस्मितासाठी लढणाऱ्या आई-बहिणींचं सरकार आहे.
22. देशातील लोकांवर निराश होण्याची वेळ कधी येणार नाही
23. हम चलें न चलें अब देश चल पडा, अशी आठवण करून दिली
24. यावेळी सभेत लोकांच्या शरीरावर एकच कापड होतं आणि खांद्यावर एकच झेंडा होता भाजपाचा.
25. सर्वांची साथ सर्वांचा विकास हाच आपला मंत्र
26. आता आम्हाला संधी द्यायची आहे, लोकांना संधी द्यायची आहे, जे शक्तीशाली आहेत.
27. 125 कोटी देशवासी ठरवतील, त्यांनी ठरवलं तर देश प्रगतीपथावर असेल.
28. मी देशातील प्रगतीसाठी आशावादी आहे
29. संपूर्ण बहुमत लोकांनी दिलंय, याचाचा अर्थ देशाची जनता आशावादी आहे
30. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढली
31. आमच्या देशात सहा ऋतू असतात, एवढी विविधता आणखी कुठे
32. मोदी एवढा मोठा का दिसतोय, कारण त्याला ज्येष्ठांनी खांद्यावर बसवलंय
33. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या शताब्दी वर्षात पक्ष त्यांचं स्वप्न साकार करेल.
34. पंडित दीनदयालजी यांच्या जीवनात विचारापेक्षा आचाराची ताकद मोठी होती.
35. आज आम्हाला जे काही मिळालं आहे, ते तपस्येचं फळ आहे.
36. संघटनेच्या वर कुणीही नाही, हेच सर्वकाही आहे.
37. पाच पिढ्या संपल्यावर हा दिवस आला आहे.
38. मी आज जनसंघाच्या दिग्गजोंमुळे आणि तपस्येमुळे येथे आहे.
39. जनसंघाच्या सर्व दिग्गजों नमन
40. ज्येष्ठांना कधीही खाली पाहावं लागणार नाही, याचा विश्वास देतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.