www.24taas.com, झी मीडिया, गांधीनगर
सोशल मीडियातून तुम्हा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, तुमच्या सोशल मीडियाच्या टीमच्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल, असा सवाल एएऩआयन नरेंद्र मोदी यांना केला. यावर नरेंद्र मोदी हे सोशल मीडियाच्या टीमविषयी काहीही बोलले नाहीत. मात्र त्यांनी सोशल मीडियाविषयीचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला.
नरेंद्र मोदी यावर बोलतांना म्हणाले, लहान मुलांनाही सोशल मीडियाकडून खूप टीप्स मिळतात. मूल परिक्षेआधी सोशल मीडियाकडून टीप्स घेत आहेत. सोशल मीडिया देशात जागृकता निर्माण करण्याचं काम करतंय.
पुढे मोदी म्हणाले, मी टॅलेण्ट शो खूप आवडायचे, जेव्हा माझ्याकडे वेळ होतो तेव्हा मी पाहायचो. मला खूप आवडायचं ते मुलांचं टॅलेण्ट, मी सोशल मीडिया जेव्हा पाहिलं तेव्हा आणखी समजलं आपल्या देशात किती हुशार मुलं आहेत. सोशल मीडियाचा वापर शिकण्यासाठी, सोशल मीडियाला मी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होत आहे.
सोशल मीडियाला राजकीय साच्यात बांधू नका, सोशल मीडिया खूप मोठी ताकद आहे. शेतकऱ्यांना कोणत्या बाजारात, कुठे चांगला भाव मिळेल यासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय. सोशल मीडिया हा सर्वांसाठी महत्वाचा आहे.
सोशल मीडियाला फक्त राजकारणाच्या दृष्टीकोनातून नाही, तर विकासाच्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.