www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची डोंबिवलीत जाहीर सभा होतेय. यावेळी, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीय. `उद्धव हॉस्पीटलमध्ये असताना अलिबागचा दौरा अर्ध्यावर सोडून हॉस्पीटलमध्ये दाखल झालो होतो... घरी जाताना गाडीत त्याच्या शेजारीच बसून होतो... बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे तेव्हा नाही आठवलं` असं म्हणताना राज ठाकरे यांची टीका वैयक्तिक पातळीवर पोहचली होती.
यापूर्वी, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसल्याची टीका केली होती. 'इतरांनी पूर्णविराम दिला असला तरी... मी ठरवीन स्वल्पविराम द्यायचा का पूर्णविराम? विषय काढल्यानंतर तो पूर्ण करतो, ते माझे काम... मी ते आज करणार...' असं म्हणत राज ठाकरेंनी आपला रोख उद्धव ठाकरेंकडे वळवला.
'मी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला?... मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या अलिबागच्या शिबीराला जात असताना लिलावतीतून डॉक्टरांचा फोन आला... उद्धवला अॅडमिट केलं होतं... मी गाडीतून येत असताना बाळासाहेबांनी माझ्या फोनवर फोन केला... अलिबागचा मेळावा अर्धवट सोडून पोहचलो होतो लिलावतीत... त्यावेळी तिथं उभं राहणं माझं कर्तव्य मी समजतो... माझं कर्तव्य मी केलं... तिथून बाहेर पडताना मी गाडी चालवत होतो... उद्धवला मातोश्रीवर मी पोहचवलं... त्याच्या ऑपरेशनच्या दिवशी मी दिवसभर बसून होतो हॉस्पीटलमध्ये... तेव्हा नाही वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजुला मी बसलोय म्हणून' असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलं.
काय म्हणाले राज ठाकरे
* दोन हात करायच्या वेळी दोन हातही करेन - राज
* आठवले म्हणजे महाराष्ट्राचा लालू... खासदारकी पदरात पडली की संपलं... - राज
* शांततेने आंदोलन केले तर फसलं... खळफट्ट्याक केले हिंसा बरी नाही... दोन्हीकडून बडवतात - राज ठाकरेंचा मीडियाकडे रोख
* आचार संहिता संपायची वाट बघतोय... निवडणुका संपू देत, मग टोलकडे बघतो
* डोंबविलीत हिरवा पाऊस पडला. मी चौकशी केली अजित पवार येऊन गेले का - राज ठाकरे
* मी आता स्वल्पविराम दिला आहे. तुला द्यायचं तर दे उत्तर... मग चालू दे सवाल जवाब २१ तारखेपर्यंत - राज ठाकरे
* सभेला महिलांची गर्दी... महिलांची विश्वास विजयाकडे नेतो - राज
* पक्षावर प्रेम करणाऱ्यांसाठी मी पक्ष काढला - राज ठाकरे
* बाळासाहेब असताना मी पक्ष काढला.... त्यांच्या पश्चात मी काढला नाही - राज ठाकरे
* या टोळक्याच्या नादानपणामुळे मी बाहेर पडलो - राज ठाकरे
* बाळासाहेब कोमात जाईपर्यंत मी पाठवलेले सूप प्यायचे
* बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे तेव्हा नाही आठवलं
* गाडीतून घरी जाताना मी उद्धवच्या बाजूला बसलो होतो
* उद्धवच्या ऑपरेशनवेळी दिवसभर मी बसून होतो
* माझं कर्तव्य मी केलं - राज ठाकरे
* अलिबागचा मेळावा अर्धवट सोडून पोहचलो होतो लिलावतीत
* इतरांनी पूर्णविराम दिला असला तरी... मी ठरवीन स्वल्पविराम द्यायचा का? - राज
* विषय काढल्यानंतर तो पूर्ण करतो, ते माझे काम... मी ते आज करणार - राज ठाकरे
* निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होणारच
* डोंबिवली : राज ठाकरेंची जाहीर सभा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.