व्हिडिओ : पवार `काकां`ची जीभ पुन्हा घसरली!

अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याला लोक विसरले नाहीत तोच काका म्हणजेच शरद पवार यांनी पुतण्याचे  आठवण करून देणारे विधान केलंय.. मोदींना मीडियानं डोक्यावर घेतल्याची टीका पवारांनी केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 9, 2014, 10:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जुन्नर
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याला लोक विसरले नाहीत तोच काका म्हणजेच शरद पवार यांनी पुतण्याचे  आठवण करून देणारे विधान केलंय.. मोदींना मीडियानं डोक्यावर घेतल्याची टीका पवारांनी केली.
`सकाळ, दुपार, संध्याकाळ ते लोक एकच नाव घेतील... मोदी... सकाळी उठल्यावर तेच... आणि सकाळी जाताना तेच (हातात लोटा घेतल्याचं दाखवत)...` असं यावेळी पवार म्हटल्यानंतर सर्वांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार न आठवतील तोच नवल...
अजितदादांची चूक झाल्यावर त्यांच्यातर्फे माफी मागणारे हेच का ते शरद पवार... आणि हाच का त्यांचा सुसंस्कृतपणा, असा प्रश्न उपस्थितांना पडल्याशिवाय राहिला नाही.

जनतेशी संवाद साधता साधता पवार कसे घसरले तुम्हीच ऐका...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.