www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेतून तीन विद्यमान नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये शारदा बाबर, आशा शेंडगे, सीमा सावळे यांचा यात समावेश आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत नसल्याची त्यांच्याबाबत तक्रार आहे. गजानन बाबर हे मनसेच्या वाटेवर आहेत. सेनेतून बाहेर पडून बाबर यांनी सेना नगरसेवकांची मोट बांधली. यात वहिणी शारदा बाबर, सीमा सावळे, आशा शेंडगे यांचा समावेश होता.
या तिन्ही शिवसेना नगरसेवक बारणे यांच्याविरोधात काम केले. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार गेल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टीचे संकेत दिले. त्यानुसार उपनेते शशिकांत सुतार याबाबत अधिकृत करण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.