www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नवनियुक्त मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय. या फोटोत स्मृती इराणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत आहेत, आणि त्यांनी शॉर्ट्स घातलीय.
सध्या 38 वर्षीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक योग्यतेवर वादंग सुरू आहे. स्मृती इराणी 1998 मध्ये मिस इंडियासाठी फायनलिस्ट झाल्या होत्या.
स्मृती इराणी यांनी 2000 साली टीव्ही मालिकांमध्ये कामाला सुरूवात केली. स्टार प्लसवरील `क्योंकि सास भी कभी बहू थी` मालिकेत `तुलसी` नावाचं पात्र स्मृती इराणी यांनी साकारलं, आणि ही तुलसी घराघरातील महिलांपर्यंत स्मृती इराणी यांची छाप सोडून गेली.
स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा वाद
सध्या स्मृती इराणी वादात आल्या आहेत, कारण 2004 आणि 2014 मध्ये लोकसभेची उमेदवारी दाखल करतांना, स्मृती यांनी वेगवेगळी शैक्षणिक योग्यता दाखवली आहे. स्मृती यांनी 2004 मध्ये म्हटलं होतं की, त्या ग्रॅज्युएट आहेत. तर 2014 मध्ये त्यांनी आपण 12 वी पास असल्याचं नमूद केलंय.
यानंतर काँग्रेस नेते अजय माकन यांनी ट्वीट करून स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह लावलं, माकन ट्वीट करून म्हणाले, `मोदींचं काय कॅबिनेट आहे, स्मृती इराणीतर ग्रॅज्युएटही नाहीत`.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह काही राजकीय नेत्यांनी स्मृती इराणी यांचा बचाव केला आहे, माकन यांनी लावलेल्या अंदाजानुसार नागरी उड्डयन मंत्री अशाच व्यक्तीने व्हायला पाहिजे, जो विमानाचा पायलट असेल, असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.