www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
शिवसेना हा ओरिजिनल म्हणजेच नवनिर्मित पक्ष आहे. तर राष्ट्रवादी हा विकाऊ आणि गद्दारांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे काय मिळते काय, यावर त्यांचा डोळा असतो, अशी जोरदार टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई येथे केली. याचवेऴी शिवसेना-भाजप युती सर्व जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला.
नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केलीय. आधी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि आता नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असं म्हणतं राज ठाकरेंना टोला लगावला. शिवसेनेत सेटिंग होत नाही असा टोलाही यावेळ उद्धव ठाकरेंनी लगावला. शिवसेनेकडे जिंकणारे वीर आहेत, कल्याण, ठाण्याची जागा शिवसेना जिंकणारचं असा विश्वासही यावेळी उद्वव ठाकरें व्यक्त केला.तर गुजरात दंगलीवरुन मोदींवर टीका करणारे शरद पवार नागपुरातल्या गोवारिंचे हत्याकांड विसरले का ? असा सवालही उद्धव यांनी विचारला.
पवारांवर टीका करताना उद्धव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. सर्वप्रथम मी भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना उघड पाठिंबा दिला. मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती आहे. मनसे केवळ पाडापाडीचे काम करत आहे. आमचं शिवबंधन अजूनही शाबूत आहे. ही लढाई आमच्यासाठी अग्निपथ आहे आणि तो आम्ही पार करणारच. सर्व जागा जिंकू, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
आम्ही हिंदुत्वावर बोललो तर कारवाईची भाषा. मग ओवेसिवर का कारवाई होत नाही. आम्ही षंड नाही, आम्ही बोलणारच, असा इशारा उद्धव यांनी दिला. त्याचवेळी काँग्रेसला टीकेचे लक्ष केले. काँग्रेस पक्ष हा आत्मविश्वास नसलेला पक्ष आहे. आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला. मात्र, काँग्रेस ते करू शकलेली नाही. नेहमी गुजरातमधील हत्याकांडाचा विषय काढला जातो. आधी ग्रोधाचं उत्तर द्या, असा खडा सवाल उद्धव यांनी यावेळी उपस्थित केला.
शिर्डीमधील उमेदवाराबाबत भाष्य करताना उद्धध म्हणालेत, शिर्डी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवाराबाबत एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. शिवसेनेचे शिर्डीतले उमेदवार बबनराव घोलाप यांची उमेदवारी गरज पडली तर बदलली जाऊ शकते असे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत. ते ठाण्यातल्या खारेगावमध्ये बोलत होते. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी घोलप यांना मुंबई सत्र न्यायालयानं 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
उद्धव यांच्या भाषणातील मुददे
*शिवसेना हा ओरिजिन असला तरी ओरिजिनल पक्ष
*राष्ट्रवादी हा विकाऊ पक्ष आहे.
*राष्ट्रवादी हा गद्दरांचा पक्ष
*नरेंद्र मोदींना पहिला उघड पाठिंबा मी दिला
*मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती आहे.
*मनसे फ़क्त पाडापाडीचं काम करते
*आमच शिवबंधन अजुन शाबूत आहे.
*हा आमचा अग्निपथ आहे. तो आम्ही पार करणार
*सर्व जागा जिंकणारच
*सत्ता आली तर पोलिसांना फ्री हॅण्ड देणार
*ईशरत जहाँ निर्दोष तर मग प्रज्ञासिंग ठाकुरच काय?
*आम्ही काही बोललो की हिंदुत्ववादी...ओवेसिवर कारवाई कधी?
*आम्ही आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला,
* पंतप्रधान पदाचा उमेदवार काँग्रेस का जाहीर करत नाही?
*कांग्रेसमध्ये आत्मविश्वासच नाही
*शरद पवार यांनी सगलिकडे डोळे लावले आहेत, कुठून काही मिळते का ते पाहत आहेत
*गुजरातमध्ये हत्याकड़ झाले असेल, मग गोध्राच उत्तर दया?
*ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार, अशी आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.