उर्वशी राज ठाकरे `मनसे` प्रचारात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या मदतीला त्यांची धर्मपत्नी शर्मिला याही निवडणूक आखाड्यात उतरल्यात. आता तर राज यांची लाडली उर्वशी राज ठाकरे प्रचारात सहभागी झाली आहे. पुण्यात दीपक पायगुडे यांच्यासाठी बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2014, 12:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या मदतीला त्यांची धर्मपत्नी शर्मिला याही निवडणूक आखाड्यात उतरल्यात. आता तर राज यांची लाडली उर्वशी राज ठाकरे प्रचारात सहभागी झाली आहे. पुण्यात दीपक पायगुडे यांच्यासाठी बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत राज्यात १० ठिकाणीच आपले उमेदवार उभे केले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपले खासदार निवडून यावेत यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील आहे. मनसेकडून आपल्या परीने सर्वोत्तम प्रचार करण्याचे काम सुरु आहे. मनसेनेने नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊन विकासाला साथ सांगत प्रचार सुरु केलाय.
राज यांना आपली मदत व्हावी म्हणून पत्नी शर्मिला ठाकरे यासुद्धा सर्वत्र प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी सभा घेण्याचे टाळून रोड शो, प्रचार रॅली काढून लोकांना आकर्षित करीत आहेत. आता शर्मिला ठाकरेंसोबत त्यांची मुलगी उर्वशी हिने पुण्यात बाईक रॅली काढून प्रचार केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.