कोहली आणि अनुष्काची झाली पोलखोल!

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईला आला होता. सचिनने जागरूक मतदाराची भूमिका निभावली पण भारताचा मध्य क्रमाचा फलंदाज विराट कोहली भारतात असूनही मतदान करण्यास आला नाही.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 29, 2014, 08:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी दुबईहून मुंबईला आला होता. सचिनने जागरूक मतदाराची भूमिका निभावली पण भारताचा मध्य क्रमाचा फलंदाज विराट कोहली भारतात असूनही मतदान करण्यास आला नाही.
एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कोहली १० एप्रिल रोजी दिल्लीमध्ये होता. तरीही त्याने मतदान केले नाही. गेल्या वर्षी दिल्ली विधानसभेवेळी त्याने मतदान केले होते. यावर्षी त्याला नव्या मतदारासाठी ब्रँड अम्बेसेडर निवडण्यात आली होते. वर्तमानपत्राने कोहलीची आई सरोज कोहली यांना या संदर्भात प्रश्न विचारला पण त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
दरम्यान कोहलीचे कोच राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, १० एप्रिल रोजी विराट बंगळुरूमध्ये होता. त्या मतदान करणे आवडते. कोहली भारतात होता पण दिल्लीत नव्हता असे कोहलीच्या पर्सनल कोचने सांगितले. भारतात असून कोहली मतदानाला गेला नाही म्हणून त्याच्यावर टीका होत आहे.
निवडणूक आयोग लक्ष घालणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. निवडणूक आयुक्त डॉ. नसीम जैदी यांनी सांगितले, की भारताच्या कोणत्याही नागरिकाला मतदान करणे किंवा नाही करणे है ऐच्छिक आहे. पण त्याला अँबेसेडर नियुक्त केल्यानंतर विराटने मतदान करणे हे त्याचे नैतिक कर्तव्य आहे. विराट कोहली मतदान केंद्रावर गेला नसल्याचे आमच्या कर्मचाऱ्यांनी माहित केल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे. अनुष्का भारतात होती पण शुटिंगसाठी राजस्थानमध्ये होती अशी माहिती समोर आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.