नरेंद्र मोदीच्या पत्नीने कोणाला टाकले अडचणीत?

पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटूंबिय यांना सुरक्षा देण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) संभ्रमात पडलय. याला कारणही तसंच आहे. मोदी यांनी बडोदामधून उमेदवारीचा अर्ज भरताना आपण स्वतः विवाहित असल्याचं शपथपत्र दिल होतं. त्यामध्ये मोदी यांनी पत्नीचं नाव जशोदाबेन सांगितलं.

Updated: May 8, 2014, 07:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटूंबिय यांना सुरक्षा देण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) संभ्रमात पडलय. याला कारणही तसंच आहे. मोदी यांनी बडोदामधून उमेदवारीचा अर्ज भरताना आपण स्वतः विवाहित असल्याचं शपथपत्र दिल होतं. त्यामध्ये मोदी यांनी पत्नीचं नाव जशोदाबेन सांगितलं.
जर का भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. तर त्याची ६२ वर्षीय पत्नी जशोदाबेन यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतील. तसेच मोदींची आई हिराबेन यांच्या सुरक्षते बाबत एसपीजी चर्चा करत आहे. हिराबेन गांधीनगरमध्ये राहत आहेत. तर जशोदाबेन सध्या स्वत:च्या भावाकडे राहत आहेत. या आधी जशोदाबेन पंचाळवासमध्ये १०० स्केअर फूटच्या घरात राहत होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, एसपीजी यांना पंतप्रधान यांच्या पत्नीला सुरक्षा देणे सक्तीचं आहे. मात्र मोदी आणि त्याची पत्नी जशोदाबेन गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे एसपीजींची कोंडी झालीय. एसपीजी मोदींची पत्नी आणि आई यांच्या राहण्याच्या बाबत गुजरात पोलिस स्थानिक गुप्तचर शाखा संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.