मुंबई : पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
सुखी जीवनासाठी खूप गरजेचे आहे पती-पत्नीने दोघांनी समजले पाहिजे की त्यांच्या पार्टनरला कोणती गोष्ट आवडते आणि कोणत्या गोष्टीची चिड येत. पतीलाही हे माहिती हवे की आपल्या पत्नीला कोणती गोष्ट आवडत नाही.
अशा पाच गोष्टी त्यामुळे पत्नी खूप चिडते. या गोष्टी आपल्या पत्नीशी बोलल्यावर ती खूप चिडते.
१) तू खूप सुंदर दिसते पण माझ्या आईपेक्षा नाही. तुम्हांला तुमच्या पत्नीला जरा चिडवायचे असेल तर एकदा अशी मस्करी केली तर चालते पण वारंवारं असे बोलले तर ती याने वैतागते आणि जबरदस्त चिडते. तसेच ती तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते.
२) तुमच्या मित्रांच्या पत्नीची प्रशंसा तु्म्ही तुमच्या पत्नीसमोर करत असाल तर करून नका... त्यांना खूप वाईट वाटते. जास्त करून पुरूषांना माहीत नाही की महिलांना दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे आवडत नाही. त्यात आपल्या पतीच्या तोंडून दुसऱ्या महिलेची प्रशंसा ऐकणे महिलांना बिल्कूल आवडत नाही.
३) अनेक घरांमध्ये असे होते की पुरूष ऑफिसवरून आल्यावर लगेच टीव्हीचे रिमोट घेऊन बसतात. पत्नीची सुरू असलेली मालिका बंद होते. त्यामुळे पत्नीला राग येऊ शकतो.
४) बहुतांशी पुरूषांना सवय असते की ते आपले सामान व्यवस्थित ठेवत नाही. ओला टॉवेल बिछान्यावर ठेवतात, घाण मोजे सोफ्याच्या खाली टाकतात अशा अनेक गोष्टी... घर सजवून ठेवणाऱ्या पत्नीला पतीची या सवयी बिल्कूल आवडत नाही.
५) आपली चूक स्वीकार नाही करणे, अनेक वेळा असे होते की, पुरूषाला माहिती असते की तो चुकीचा आहे, पण ते तो स्वीकार करत नाही. अशा गोष्टी पत्नीला आवडत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.