मुंबई : सध्या उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणतीना कोणती क्रिम वापरत असाल तर काळजी घ्या. घरातून बाहेर पडताना अनेकजण सनस्क्रीन लोशनचा वापर करतात. मात्र, ती बनावट असू शकते. शहरात अनेक ठिकाणी बनावट साठा जप्त करण्यात आलाय.
सनक्रिम खरेदी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बनावट सनक्रिममुळे त्वचा रोग किंवा त्वचेला हानी पोहोचू शकते. दरम्यान, बनावट क्रिम प्रकरणी अन्न व औषध विभागाने कारवाईकरताना मुंबईतील क्रॉफर्ड माक्रेट आणि भोईवाडा येथे छापा मारण्यात आला.
यावेळी सुमारे २.५ कोटींचे बनावट सनस्क्रीन लोशनची पॅकेट्स जप्त करण्यात आली, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी दिली आहे. त्यामुळे सनस्क्रीन लोशन खरेदी करताना ते स्वस्त दरात मिळते म्हणून ते खरेदी करू नका, असा सल्ला ते देतात.
सनक्रिमची एक्स्पायरी डेट आणि इतर माहिती तपासून पाहा. तसेच ज्याठिकाणी खरेदी कराल त्याच ठिकाणी सनक्रिम खरेदी करा. बिल मिळणार नाही, अशा ठिकाणाहून खरेदी करु नका, असे आवाहन हर्षवर्धन कांबळे यांनी ग्राहकांना केले आहे.