घरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स

 आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते. 

Updated: Oct 12, 2015, 05:56 PM IST
घरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स  title=

नवी दिल्ली :  आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते. 

योग्य आहाराने गर्भधारणा सहजतेने 

ज्या महिला गर्भधारणेसाठी तयारी करत आहे, त्यांनी आहारात आंबट फळ खाणे गरजेचे आहे. या फळांमध्ये व्हिटामीन सी अधिक असते. त्यामुळे अंडाशयातून अंडकोश बाहेर येण्यास मदत होती. महिलांनी आहारात शिजवलेले बटाटे खाल्ले पाहिजे. बटाट्यात व्हिटामीन बी आणि ई असेत त्यामुळे कोशिकांचे विभाजन वाढते त्यामुळे चांगले अंडकोश उत्पादनाची क्षमता वाढते. 

तसेच डाळींब महिला आणि पुरूषांमध्ये कामेच्छा वाढविते. ज्या महिला मासिक चक्र नियमित असते. ज्यांना वंधत्वाची समस्या नाही तसेच गर्भधारणेत समस्या नाही. अशा महिलांनी केळी खाल्ली पाहिजे. त्यात व्हिटामीन बी ६ अधिक प्रमाणात असते. तिखट खाद्य पदार्थ जशी मिरची खाल्ल्याने प्रजनन क्षमता वाढते. त्यामुळे शरीरात रक्ताचा प्रभाव वाढतो. रक्त प्रवाह प्रजनन तंत्राला स्वच्छ करण्यात मदत करतो. 

नियमित सेक्स करणे 

बिजी शेड्यूलमुळे दाम्पत्याला यौन संबंध निर्माण करण्यास वेळ मिळत नाही. फर्टिलीटी एक्सपर्टनुसार महिलांमध्ये पिरीअड सायकल अनियमित असेल तर त्यांनी पतीसोबत दर दोन दिवसांनी सेक्स करणे गरजेचे आहे. त्यामुळे गर्भवती होण्यात मदत होती. सेक्समध्ये गॅप पडल्यास गर्भधारणेत अडचणी होते. 

ओव्ह्युलेशनपूर्वी सेक्स संबंध 

प्रेग्नेंसी एक्सपर्टनुसार ओव्ह्युलेशन म्हणजे डिंबोत्सर्जनपूर्वी यौन संबंध बनविणे गरजेचे आहे. डिंबोत्सर्जनपूर्वी दोन दिवस अगोदर यौन संबंध प्रस्थापिक केल्याने प्रेग्नेंसीची शक्यता वाढते. शुक्राणू गर्भाशयात २४ तेस ४८ तास जीवंत राहू शकतात. त्या दरम्यान, अंडाशयाच्या संपर्कात आल्याने शुक्राणू आल्याने प्रेग्नेंसीची शक्यता वाढू शकते, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेऊन सेक्स करणे गरजेचे आहे. 

आनंद घ्या. 

सेक्स एक्सपर्ट आणि प्रेग्नेंसी एक्सपर्टनुसार सेक्स तणावात न करता त्याचा आनंद घ्या. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. हे एक ओझ आहे आणि आपल्याला ते वाहून न्यायचे आहे अशी भूमिका असल्यास गर्भधारणेत अडचणी येतात. आयुष्यातील अनेक चढ उतार असताना आनंदाने सेक्स करताना त्यात सामील होणे गरजेचे आहे. त्याने गर्भधारणेची शक्यता वाढते. 

धैर्य धारण 

फर्टिलीटीत अडचणींमुळे गर्भधारणेत महिलांना अडचणी होतात. ५० टक्के दाम्पत्यांना लग्नानंतर सहा महिन्यांच्या आत गर्भधारणा होते. पण उरलेल्यांपैकी ८५ टक्के प्रकरणात असे होते की ८५ टक्के प्रकरणात महिलांना गर्भधारणेसाठी एक वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे धैर्य ठेवणे गरजेचे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.