वजन कमी करायचेय? तर मग असे चाला!

तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.

Updated: Oct 10, 2015, 06:31 PM IST
वजन कमी करायचेय? तर मग असे चाला! title=

नवी दिल्ली : तुम्हाला स्वत:चे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुमच्या नेहमीच्या चालण्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. नियमित वेगवान चालण्यामुळे आपल्या कॅलरीज कमी होतात. मात्र, तुम्ही चालण्याचा सवईमध्ये बदल करणे गरजेचे आहे. चालण्याच्या वेगवेगळ्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष पुढे आलाय.

ओहियो स्टेट विद्यापाठाच्या संशोधकांना असे आढळून आले की, एक समान गतीत चालणे आणि वेगवान गतीत चालण्यामुळे २० टक्के अधिक कॅलरीज कमी होतात. अभ्यासकांनी वेगवेगळ्या गतीने चालण्याबाबत कॅलरीज कमी होतात, याचा प्रथमच अभ्यास केला. आतापर्यंत केलेल्या अभ्यासात जास्त करुन एक समान गतीत चालण्याबाबत अभ्यास केला. त्यातून कमी होण्याऱ्या कॅलरीजवर लक्ष केंद्रीत केले गेले होते.

संशोधन करणारे सहाय्यक लेकख मनोज श्रीनिवासन यांचे म्हणणे आहे की, वेगवान गतीत चालण्यामुळे मेटॉबोलिकची माहिती अधिक महत्वपूर्ण आहे. कारण सर्व लोग ट्रेडमिलचाय वापर करीत नाही आणि एक समान गतीत चालत नाहीत. अभ्यासात असे लक्षात आलेय की, वजन कमी करण्यासाठी पारंपरिक प्रकारांचा वापर केला जात आहे. रोज चालणे किंवा खेळल्याने कॅलरीज कमी होतात. यावरच भर दिला जात नाही. श्रीनिवासन यांचे म्हणणे आहे,  वेगवान गतीने चालल्याने कॅलरीजमध्ये घट होते.

संशोधनात असे स्पष्ट झालेय की, सामान्यपणे चालल्याने ८ टक्के कॅलरीज एनर्जीचा उपयोग केला जातो. लेखन निधी सीतापथी यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही गतीत चालले तरी काही ऊर्जा कमी होते. मात्र, तुम्ही आपल्या चालण्यात बदल करणार असाल तर आपल्या पायांवर जास्त जोर देत असाल. तुम्ही तुमच्या ऊर्जेत बदल करावयाचा असेल तर आपल्या पायांना जास्त काम घ्यावे लागेल. त्यामुळे वेगवान चालण्यामुळे अधिक ऊर्जा वापरली जाईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.