२०५० पर्यंत अर्ध जग मायोपियाग्रस्त होणार

सिडनी : सिडनातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार २०५० सालापर्यंत जगभरातील जवळपास पाच अब्ज लोक मायोपियाने(दूरचे न दिसण्याचा आजार) ग्रस्त होणार आहे.

Updated: Feb 21, 2016, 10:46 AM IST
२०५० पर्यंत अर्ध जग मायोपियाग्रस्त होणार title=

सिडनी : सिडनातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार २०५० सालापर्यंत जगभरातील जवळपास पाच अब्ज लोक मायोपियाने(दूरचे न दिसण्याचा आजार) ग्रस्त होणार आहे. म्हणजेच जगातील अर्धी लोकसंख्या या आजाराने ग्रस्त असेल.

मायोपिया हा डोळ्यासंबंधी एक आजार आहे ज्यात दूरचे पाहण्यास त्रास होतो आणि दूरवर ठेवलेल्या गोष्टी अंधूक दिसतात. या संशोधनानुसार २००० साली या आजाराने ग्रस्त लोकांची अमेरिकेतील संख्या ९० लाख इतकी होती. २०५० साली ही संख्या तब्बल २६ कोटी इतकी होऊ शकते.

जीवनशैलीतील बदल तसेच पर्यावरणातील बदलामुळे या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. वर्षातून एकदा डोळ्यांची नियमित तपासणी केल्यास आजारापासून बचाव करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.